आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनीसह राज्यातील पाच धरणांतील गाळ काढणार, शेतकऱ्यांना मिळणार मोफत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/सोलापूर- राज्यातील उजनी, जायकवाडी, गिरणा, गोसीखुर्द या प्रकल्पांमध्ये ३० ते ४० टक्के गाळ साचला अाहे. त्यामुळे पाणीसाठ्यास मर्यादा येत अाहेत. या धरणांतून गाळ गाळमिश्रित रेतीचा उपसा करणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. या प्रकल्पांमधून गाळाचा उपसा केल्याने धरणामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना हाेईल. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी धरणातील माती कुठलाही मोबदला घेता त्यांना दिली जाणार आहे, असेही महाजन यांनी सांगितले. 

जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या मोठ्या धरणातील गाळ काढण्यात येणार असून, त्यामधून मिळणारा महसूल सिंचन प्रकल्पांच्या त्यानुसार धाेरणात्मक बदल करण्यासही मंजुरी देण्यात अाली.

एकाचवेळी पाचही प्रकल्पाचा होणार लिलाव...
धरणातील गाळ गाळयुक्त रेती काढण्याच्या बदल्यामध्ये कंत्राटदाराने उपसलेल्या गाळमिश्रित रेतीमधून वाळू रेती वेगळी करण्यात येणार आहे. त्यानंतर वाळू रेतीच्या परिणामाएवढे स्वामित्व शुल्क महसूल विभागाकडे प्रचलित दराने भरून कंत्राटदारांना विकण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रायोगिक निवड केलेल्या पाचही प्रकल्पांतून गाळ गाळमिश्रित वाळू काढण्यासाठी एकाचवेळी प्रकल्पनिहाय ई-निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. ई-निविदेची कार्यपद्धती, कंत्राटाच्या अटी, शर्ती आवश्यक मार्गदर्शक सूचना शासन मान्यतेने पाटबंधारे विकास महामंडळ स्तरावरून निश्चित करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील निविदेचा कालावधी १५ वर्षांचा असेल. याबाबतचे धोरण लवकरच स्पष्ट करण्यात येणार आहे. 

शेतकऱ्यांना गाळ मोफत...
शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात गाळ टाकण्यासाठी कोणतेही स्वामित्व शुल्क भरावे लागणार नाही. त्यांना केवळ स्वखर्चाने गाळाची वाहतूक करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना गाळ मोफत मिळाल्यामुळे पडीक जमिनी सुपीक होण्यास मदत होईल. त्यातून शेतीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ शक्य होईल. 

नाशिकच्या मेरी या संस्थेने २०११ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार उजनी धरणामध्ये आज १५ टीएमसी गाळ आहे. यापैकी ११ टीएमसी गाळ मृत साठ्यामध्ये तर टीएमसी गाळ उपयुक्त साठ्यात आहे. १५ टीएमसीपैकी ६० टक्के रेती तर ४० टक्के गाळ आहे. मागील वर्षांमध्ये यामध्ये ०.२५ टीएमसी गाळ वाढ झाल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे धरणाची निर्मिती झाल्यापासून ते आजपर्यंत एकदाही धरणातून गाळ काढण्यात आला नाही. मागील दोन वर्षांपूर्वी खासदार विजयसिंह मोहिते यांनी धरणातून वाळू उपसा करण्यात यावा. यातून मिळालेल्या महसुलातून कृष्णा-भीमा स्थिरीकरण इतर प्रकल्प पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही मागणी गांभीर्याने घेतली नव्हती. आता भाजप सरकारच्या काळात निर्णय झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...