आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकटेंच्या खात्यात एक लाख जमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- समाजकल्याण विभागाने अकलूजच्या सहारा शिक्षण संस्थेला शिष्यवृत्ती पाठवल्यानंतर त्यांच्या खात्यातून समाजकल्याणचे निरीक्षक अंगद मुकटे यांच्या वैयक्तिक खात्यावर एक लाख रुपये जमा झाले. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला जाऊ नये, अशी बाजू सरकारी वकील अॅड. प्रवीण शेंडे यांनी शुक्रवारी मांडली.

समाजकल्याण विभागातील शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणातील आरोपी अंगद मुकटे यांच्यावतीने २० जून रोजी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर आहे. याप्रकरणी न्यायाधीश विभा कंकणवाडी यांच्या न्यायालयात शुक्रवारी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. २९ जुलै ही पुढील तारीख दिली.

मुकटे यांनी बोगस संस्थाच्या नाव रकमा वर्ग केल्या. सहाराच्या नावावर जी शिष्यवृत्ती जमा झाली, त्यातील काही रक्कम मुकटे यांच्या नावावर जमा झाली. आणि जुलै रोजी मुकटे यांनी कोट्यवधींची शिष्यवृत्ती वितरित केली. याबाबत सविस्तर माहिती अत्यावश्यक आहे. म्हणून जामीन नको असा मुद्दा मांडला.