आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचा पाहुणा म्हणून आला आणि सोलापूरच्या मुलीला पळवनू नेले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर | नातेवाइकांकडे विजापूर नाका भागात वास्तव्यास असलेल्या आकाश भालेराव या मुंबईच्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून मुलीला (वय १५) पळवून नेले. आकाश भालेराव (रा. कुस्तुरबा मार्केट, कुर्ला, मुंबई) हा गेले १५ दिवस झाले नातेवाइकांकडे वास्तव्यास होता. त्या दरम्यान त्याची पीडित मुलीशी ओळख झाली. लग्नाचे आमिष दाखवून २६ ऑक्टोबर रोजी तिला घेऊन तो गेला. मुलीच्या नातेवाइकांनी मुंबईत चौकशी केली असता ते दोघे तेथून पळून गेल्याचे सांगण्यात आले. पीडित मुलीच्या वडिलांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. आकाश भालेराव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.