आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा प्रसूतीगृहांवर अवकळा , काही ठिकाणी नाही पिण्याच्या पाण्याची सोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापुर - वेळेवर उपचार नाही, भौतिक सुविधांचा अभाव आणि अस्वच्छतेचा विळखा यामुळे महापालिकेच्या प्रसूतीगृहांकडे सर्वसामान्य कुटुंबांतील गर्भवती महिलांनी अक्षरश: पाठ फिरवली आहे. १० वर्षांपूर्वी महापालिकेच्या डफरीन प्रसूतीगृहात दिवसाकाठी शंभर ते १०० रुग्णांची तपासणी होत असे. आज या ठिकाणी दिवसाकाठी दोन महिलाही फिरकत नाहीत, अशी स्थिती आहे.

गरीब महिलांची प्रसूती सुखकर व्हावी, मोफत बाळंतपण आणि योग्य आहार उपचार मिळावेत या हेतूने महापालिकेने प्रसूतीगृह उभारले. पण महिलांच्या मनात या प्रसूतीगृहांबद्दल पूर्वीइतकी विश्वासाची भावना राहिली नाही. रात्री - अपरात्री अडलेल्या महिलेला पालिकेच्या प्रसूतीगृहात सुरक्षित बाळंतपणाचे उपचार मिळतीलच याची खात्री नाही. महापालिका प्रसूतीगृहे चालवते. यातील प्रत्येक प्रसूतीगृहात सरासरी एक-दोन महिलाही जात नाहीत.

एककाळ असा होता, १०० महिलांची तपासणी होत असे
मनपाआरोग्य विभागाच्या माजी प्रमुख डॉ. राजेश्वरी मुदलियार म्हणाल्या, ""तेव्हा मनपा प्रसूतीगृहांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी असे. मी एका वेळी १०० रुग्णांची तपासणी करीत असे. महिलांचा विश्वास होता.'' कुटुंबकल्याणच्या योजनेसाठी त्यांना सलग १७ वर्षे सुवर्णपदक मिळाले होते. महापालिकेच्या आजच्या व्यवस्थेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आठ प्रसूतीगृहांमध्ये केवळ एक सोनोग्राफी मशीन
महापालिकेच्याआठ प्रसूतीगृहांत मिळून एकच सोनोग्राफी मशीन डफरीन प्रसूतीगृहात आहे. सकाळी ते ११ या वेळेतच तेथे तपासणी होते. त्यामुळे विविध भागांत राहणा-या महिलांना गर्दीच्या ठिकाणी यावे लागते. बाळात काही व्यंग असेल तर मशीनअभावी उशिरा कळते, परिणामी पुढील काळात धोका पत्करावा लागतो.

शिफ्टनुसार हवेत डाॅक्टर्स
दिवसाकिंवा रात्री कधीही रुग्ण मनपा प्रसूतीगृहात जाऊ द्या, आपल्याला उत्तम सेवा मिळेल याचा त्यांना विश्वास वाटला पाहिजे. सर्व काही मोफतच द्यावे. सेवाही उत्तम असावी. कर्मचारी भरून सेवा द्यावी. डॉ.राजेश्वरी मुदलियार, माजीमनपा आरोग्य विभाग प्रमुख
प्रस्ताव पाठवला आहे

आमच्याकडेउत्तम डॉक्टर तज्ज्ञ कर्मचा-यांचा तुटवडा आहे. त्यामुळे अशी उदासीनता आहे. आता प्रस्ताव पाठवला आहे. मग सर्व कामे करू. भौतिक सुविधा आणि कार्मिक व्यवस्थापन दोन्हींचा मेळ बसवू. डॉ.जयंती आडकी, आरोग्यअधिकारी

२०१३-१४ मधील प्रसूतीचे प्रमाण
शहरात जिजामाता, दाराशा, साबळे, भावनाऋषी, चाकोते, आहिल्याबाई होळकर, बॉईस, रामवाडी ही आठ प्रसूतीगृहे महापालिकेकडून चालवली जातात

यामुळेहोतात हाल
अस्वच्छ स्वच्छतागृहे, गरम पाणी नाही यामुळे महिलांचे हाल होतात. घाणीचे साम्राज्य यामुळे रुग्णांचे नाजूक दिवस दुर्गंधीत घालवावे लागतात. जिजामाता रामवाडी प्रसूतीगृहात घाणीचे साम्राज्य आहे.

बाळंतपणासाठीआलेल्या महिलांना मनपा प्रसुतीगृहतील अस्वच्छ लेबर रूम पाहूनच किळस येते. डफरीन आणि दाराशा येथील दवाखान्यांत फाटलेले बेड आणि अस्वच्छ लेबर रूम पाहावयास मिळते.

रात्रीसेवा नाहीच
सकाळीते ११ या वेळेत ओपीडी असते. गर्भवतींना दिवसा कळा आल्या तर डॉक्टर्स येतात. रात्रीच्या वेळी महिलांना संकटांना सामोरे जावे लागते. रात्री स्टाफ नर्सकडूनच बाळंतपण करून घ्यावे लागते. टाक्यांची भीती महिलांना सोसावी लागते. गुंतागुंत झाल्यास जबाबदार कोण, हाही प्रश्न आहेच.

खिडक्यांची तावदाने फुटलेली, प्रवेशद्वारात कचरा विखुरलेला, रंगरंगोटी नाही, प्रसन्न वाटेल असे वातावरण नाही. जिजामाता प्रसूतीगृहाची अवकळा दिसून येते.

महिन्याकाठी लाखाचा खर्च, रुग्णांची संख्या मात्र तीसच
आठ प्रसुतीगृहांमधील कर्मचा-यांवर दरमहा लक्षावधी रुपयांचा खर्च होतो. प्रत्येक प्रसूतीगृहात महिन्याकाठी सरासरी ३० महिलाच दाखल होतात. एका महिलेच्या प्रसूतीसाठी मनपाला तीन ते चार हजार रुपये इतका खर्च येतो. तुलनेने एका प्रसूतीगृहातील कर्मचा-यांच्या वेतनापोटी मात्र महिन्याकाठी लाखाचा भुर्दंड सोसावा लागतो.

बाहेरून आणावी लागतात औषधे आणि साहित्य
नऊ महिन्यांचा उपचार आणि संपूर्ण बाळंतपण महापालिकेने करणे आवश्यक आहे. मात्र नऊ महिन्यांच्या काळात आणि नंतरही रुग्णांना सॅनिटरी पॅड आणि औषधे बाहेरून विकत आणावी लागतात. हे बदलण्याची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...