आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उठल्या बाॅम्बच्या अफवा, उडाली पोलिसांची भंबेरी, झाली धावाधाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून सर्रासपणे कचराकुंडीतच कचरा जाळण्याचे प्रकार वाढले अाहेत. हे बेकायदा असल्याचे अधिकारी सांगतात. पण हे कृत्य शुक्रवारी अासरा चौकात एका रिक्षा चालकांच्या जिवावरच बेतले होते. तो किरकोळ जखमी झाला. शहरात अनेक ठिकाणी कचरा जाळला जातो. त्याची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे दुर्घटना तर घडत आहेतच पण प्रदूषणही होते अाहे. महापालिका याबाबतीत गंभीर नसल्याचेच या घटनेतून समोर अाले.
नितीन गुंडीबा ताकमोगे (वय २८, रा. ताकमोगेवस्ती, ताता पार्कजवळ) हे रिक्षाचालक अाहेत. त्यांची रिक्षा बंद पडली म्हणून बालाजी सरोवर हाॅटेलसमोरील बालाजी अॉटो गॅरेज येथे रिक्षा अाणून थांबवली. अंदाजे शंभर मीटर अंतरावर कचरा पेटवला होता. त्यातून अाऊट गोळा उडून रिक्षाच्या काचेला धडकला. ठिणगी उडून सीटवर पडली. त्यामुळे रिक्षाच्या टफाने पेट घेतला.
रिक्षाचालक ताकमोगे यांच्या हाताला मांडीला जखम झाली. यामुळे ते गांगरून गेले. बघ्यांची गर्दी जमली. पाणी मारून रिक्षाची अाग विझवली. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर अायुक्त रवींद्र सेनगावकर, उपायुक्त बाळसिंग रजपूत, सहायक अायुक्त दत्तात्रय घोगरे, निरीक्षक एन. बी. अंकुशकर, एटीएसच्या सहायक निरीक्षक सीमा सुर्वे यांच्यासह श्वान पथक, बीडीडीएस पथक अाले. हॅन्ड मेटल डिटेक्टरने तपासणी केली. बाॅम्ब शोधणारा श्वान प्रीन्सलाही अाणले होते. कचऱ्याचे नमुने घेतले. पुठ्ठे, माती, राख तपासण्यासाठी घेतले.

नितीनची रिक्षा बंद पडली अन् प्रसंग उद्भवला
नितीन ताकमोगे यांची रिक्षा शिवाजी चौकात असताना बंद पडली. एका रिक्षा चालकाच्या साह्याने रिक्षाला पायाचा अाधार देऊन अासरा चौकापर्यंत अाणली. गॅरेजसमोर रिक्षा लावून नितीन अातच बसले होते. काही क्षणात फटका उडून हा प्रकार घडला.

रात्री उडालेले फटाके होते
बालाजी सरोवर हाॅटेलमध्ये गुरुवारी लग्न होते. त्यासाठी बाहेर रस्त्यावर फटाके फोडले होते. शंभर अाऊट गोळ्यांच्या बाॅक्समधील दोन-तीन गोळे शिल्लक होते. फटाक्याचा बाॅक्स कचरा म्हणून उचलून अाणून अन्य कचऱ्यासोबत पेटवला. त्यानंतर फटाका गोळा उडून रिक्षात पडला. एक गोळा दुसऱ्या बाजूला उडाला. फटाके कुणी फोडले याची नेमकी माहिती समोर अाली नाही. घटनास्थळाच्या चौकशीत कालच्या लग्नसमारंभातील असल्याचे सांगितले.

अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल
फटाके गोळे उडवून त्याची विल्हेवाट लावली नाही. सकाळी कचरा जाळताना फटाके उडून रिक्षाचालक जखमी झाला. या घटनेला जबाबदार धरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहायक निरीक्षक संजय भोसले यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली.

परवानगीनेच फटाके उडवा
^यापुढे फटाकेफोडताना पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. रस्त्यावर फटाके फोडता मैदानावर फोडावे लागेल. रात्री दहानंतर फटाके फोडता येणार नाही. अाज नोटिफिकेशन काढणार अाहे. दक्षता म्हणून फटाक्याचे नमुने, जळालेली राख, माती तपासणीसाठी घेतले अाहेत.'' बाळसिंग रजपूत, पोलिसउपायुक्त

कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई
^शहरात कुठेही कचरा साचू देणार नाही. जेणेकरून कचरा जाळण्याचा प्रयत्न होणार नाही. गल्लीबोळातलाही कचरा उचलला जाणार आहे. सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिली आहे. तरीही कोणी मनपा कर्मचारी कचरा जाळत असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल आणि नागरिकांनीही कचरा जाळू नये.'' अमिता दगडे पाटील, उपायुक्तमहापालिका
लोखंडी कुंडीत कचरा जाळल्याने होते नुकसान
मनपाचे कामगार झाडू मारतात. परंतु कचरा उचलून उकिरड्यात टाकता जागोजागी टाकतात आणि तेथेच तो पेटवून देतात. नव्या लोखंडी उकिरड्यातही कचरा जाळला जातो. त्यामुळे ते उकिरडे खराब होऊन त्याचे तुकडे पडतात. पावसाळ्यात पाण्याने गंजू नये याकरीता उकिरड्यांना रबरी चाक लावण्यात आले आहेत. मात्र कुंडीतच कचरा जाळल्याने ते रबरी चाक पूर्णपणे जळून खाक होतात आणि नंतर नंतर तो उकिरडाही खराब होतो. प्रभाग क्रमांक २७ मधील भय्या चौक ते रेल्वे स्टेशनला जाण्याच्या मार्गावर लोखंडी कचरा कुंडीत आग लावल्यामुळे सर्वत्र धूर पसरला होता.