आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणूक : ३७ हजार नागरिकांचा एक प्रभाग, एकूण २६

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - महापालिकानिवडणुकीची तयारी निवडणूक शाखेकडून तयार करण्यात येत असून, सन २०१७ मध्ये होणारी निवडणूक प्रभाग पद्धतीने असणार आहे. त्यासाठी चार सदस्यांचे २४ तर तीन सदस्यांचे दोन असे २६ प्रभाग असतील. यात सरासरी ३७ हजार लोकसंख्या असतील, अशी माहिती महापालिका निवडणूक विभागप्रमुख श्रीकांत म्याकलवार यांनी दिली.

मागील महापालिका निवडणूक दोन सदस्य पद्धतीने घेण्यात आली होती. त्यात बदल करून पुढील निवडणूक चार सदस्य पद्धतीने हाेणार आहे. त्यानुसार महापालिका निवडणूक शाखेने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभाग रचना तयार केली. सन २०११ ची जनगणना ग्राह्य धरून चार सदस्यांचे २४ तर तीन सदस्यांचे दाेन असे २६ प्रभाग तयार करण्यात आले आहे. एका प्रभागात सरासरी ३७ हजार नागरिक असतील. ्कमीत कमी ३३ तर जास्तीत जास्त ४१ हजार नागरिकांचा प्रभाग असेल.

प्रभाग रचना सॉफ्टवेअर ऐवजी कर्मचाऱ्यांच्या मदतीने (मॅन्यूअल) पद्धतीने केली आहे. यामुळे सूचना हरकती जास्त येण्याची शक्यता आहे. बुधवारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार आहेत.

मतदार नाेंदणीस जनजागृती
महापालिका निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार जनजागृती अभियान राबवणार आहे. गणेशोत्सव काळ असून, त्यामुळे मंडळाकडे मतदार नोंदणी फार्म आणि नोंदणीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. एक जानेवारी रोजी १८ वर्ष पूर्ण झाल्यास मतदार नोंदणी करता येईल.

आरक्षण सोडत ऑक्टोबर
शुक्रवारीप्रारूप रचनेचा प्रस्ताव त्रिसस्य समितीपुढे येणार आहे. या समितीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांचा समावेश आहे. २३ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव जाईल. सात ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

लोकसंख्या : ९५१५५८ पुरुष : ४८१०६४ महिला : ४७०४९४
अ. जाती : १३८०७८ पुरुष :६९३३६ महिला : ६८७४२
अनु. जमाती : १७९८२ पुरुष :९१०८ महिला : ८८७४
बातम्या आणखी आहेत...