आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभागासाठी मागायला गेले अधिकारी, आले पोलिस!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रभागातील नागरी समस्यांचे गाऱ्हाणे घेऊन आलेल्या नगरसेवकांना आवरण्यासाठी महापालिका आयुक्तांना पोलिसांना बोलवावे लागले. ही घटना सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. प्रभाग क्रमांक ४९मधील नगरसेवक नागेश ताकमोगे जयकुमार माने समस्या घेऊन आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे आले होते.

प्रभागात चार महिन्यांपासून कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक नाहीत. त्यामुळे नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दोन्ही पदे लवकर भरावी अशी त्यांची मागणी होती. ‘मला वेळ नाही’ असे म्हणून काळम-पाटील निघून जात हाेते. त्यामुळे वाद झाला. पोलिस येईपर्यंत विषय संपला होता. त्यामुळे काही तक्रार नसल्याचे पोलिसांना सागंण्यात आले. दरम्यान, महापौर प्रा. सुशीला आबुटे महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

महापौरांकडे तक्रार
आयुक्तांनी अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार केली. यावर महापौर सुशीला आबुटे यांनी त्यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली.

प्रश्न मांडायचे नाही?
माझ्या प्रभागात अधिकारी नाहीत; ते द्या, अशी मागणी करत मी दुसऱ्यादा आयुक्तांकडे गेलो. ते उठून चालले होते. मी जाब विचारल्यावर पोलिसांना बोलवले. प्रश्न आयुक्तांना विचारू नयेत काय? नागेश ताकमोगे, नगरसेवक