आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका प्रशासनाची निवडणूक तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोलापूर - सोलापूरसह दहा महापालिकांची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. निवडणूक आयोगाने त्याची तयारी सुरू केली आहे. महापालिका स्तरावर स्वतंत्र निवडणूक कक्ष स्थापण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा प्रभागऐवजी वाॅर्ड पद्धतीने निवडणुका होणार आहेत. वाॅर्ड रचना करण्यासाठी दोन संगणक खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रदीप साठे यांनी दिली.

महापालिका निवडणुकीची तयारी राजकीय पक्षाकडून करण्यात येत आहे. २०१७ च्या निवडणुका समोर ठेवून राजकीय अदलाबदल करण्यात येत आहे. त्यानुसार निवडीची प्रक्रिया सुरू आहे. भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी मनपा निवडणुका जिंकण्यासाठी आतापासून तयारी सुरू केली. राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष निवडी त्यानुसार करण्यात येणार आहे. त्यासाठी जातीचे समीकरण घातले जात आहे. काँग्रेसची भिस्त माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आहे.

महापालिकेत सत्ता असल्याने शिंदे यांनी ती टिकवण्यासाठी प्रयत्न करतील. कारण की, महापालिकेतील पदामुळे कार्यकर्त्यांची फळी तयार होईल. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने त्या आधारावर महापालिकेवर भाजप दावा करणार आहे. याशिवाय एमआयएम यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मुस्लिम बहुल भागात एमआयएमकडून विद्यमान नगरसेवक निवडणूक लढवल्यास आश्चर्य वाटणार नाही.

महिने आधी रचना
फेब्रुवारी२०१७ मध्ये निवडणूक ग्रहित धरल्यास त्यापूर्वी सहा महिने ऑक्टोबर २०१६ मध्ये वॉर्ड रचना होण्याची शक्यता आहे. नगरसेवकांना निवडणूक तयारीसाठी सहा महिने कालावधी देण्यासाठी निवडणूक आयोगाचा प्रयत्न राहणार आहे. वॉर्ड रचना करण्यासाठी दोन संगणक खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी शासकीय दरपत्रक मागवण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त साठे यांनी दिली.

११२ते ११५ वॉर्ड होण्याची शक्यता
प्रभागपद्धतीत १०२ नगरसेवक महापालिका सभागृहात आहेत. नवीन वॉर्ड रचनेनुसार सुमारे ११२ ते ११५ नगरसेवकांची संख्या होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.