आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही कारण नसताना हायमास्ट खांब सरकवण्यासाठी महापालिकेस भुर्दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वाहतूक पोलिसांची कसलीही तक्रार नसताना डाॅ. आंबेडकर चौकातील हायमास्ट दिव्याचा खांब सुमारे ३० फूट मागे हटवण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेला १.२२ लाख रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. हायमास्ट खांब स्थलांतरित करण्याचे पत्र सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी दिले आहे. रिपाइंचे नेते राजाभाऊ सरवदे यांनी पाहणीअंती या प्रकाराला विरोध दर्शवला आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवर विजेचे खांब आहेत. त्या खांबांना धडकून आजवर अनेक अपघात झाले. ते खांब हलवण्यासाठी निधी खर्च करण्याऐवजी गरज नसताना डाॅ. आंबेडकर चौकातील हायमास्टचे खांब स्थलांतरित करून लोकांच्या पैशाचा अपव्यय करण्यात येत आहे. मनपा सभागृह नेते हेमगड्डी यांच्याकडे मागणी आल्याने त्यांनी नगर अभियंता कार्यालयास पत्र दिले आणि त्यासाठी टेंडर प्रक्रिया झाली.

मागणी असल्याने पत्र
तेथील कार्यकर्त्यांची मागणी आल्याने मी पत्र दिले आहे. हायमास्ट हलवताना दुसऱ्यांचा फायदा होत असेल तर काम थांबवले जाईल. डाॅ. बाबासाहेबांवरील प्रकाश कमी होणार नाही, याची काळजी घेऊ. संजय हेमगड्डी, मनपा सभागृह नेता

स्थलांतराला विरोध
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात बसवलेला हायमास्ट स्थलांतरित होत असल्याची पाहणी केली. खांब हलवण्यास आमचा विरोध आहे. राजाभाऊ सरवदे, रिपाइं नेते.

मागणी आल्याने काम
सभागृह नेत्याकडून मागणी आल्याने पुतळा सुशोभीकरण बजेटमधून काम करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांचे पत्र नाही. झेड.ए. नाईकवाडी, झोन अधिकारी क्र.

बाबासाहेबांच्या पुतळ्यावरील प्रकाश अंशत: कमी होईल
खांबहलवल्याने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरील प्रकाश अंशत: कमी होईल. तेथे वृक्ष असल्याने त्यावर प्रकाश पडेल. दरम्यान जी. एम. मागासवर्गीय संस्थेचे बाळासाहेब वाघमारे यांनी या चौकात चार हायमास्ट बसवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

तांत्रिकमाहिती घेता काम
मनपासभागृह नेते हेमगड्डी यांनी वाहतुकीस अडथळा होत असल्याचे पत्र दिले. त्यावर झोन कार्यालयाकडून तांत्रिक माहिती घेतलेली नाही. फौजदार चावडी पोलिस किंवा वाहतूक पोलिसांचे पत्र घेता महापालिकेने काम सुरू केले. या खाबांमुळे चौकात अपघात झालेले नाहीत.

दोनहायमास्ट, वेगवेगळी भूमिका
महापौरसुशीला आबुटे यांच्या निधीतून आयटीआय पोलिस चौकीसमाेर भरचौकात बसवलेला हायमास्ट वाहतुकीला अडथळा होत नाही. पण केंद्रीय नेते सुशीलकुमार शिंदे यांनी डाॅ. आंबेडकर चौकात बसवलेल्या हायमास्टमुळे अडथळा होतो, असा शोध मनपा सभागृह नेते हेमगड्डी यांनी लावला आहे.