आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका देणार सानुग्रहासह अॅडव्हान्स बारा हजार रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका परिवहन विभागासह कायम कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी अॅडव्हान्स आणि सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान, रोजंदारी, शिवणवर्गसह इतर कर्मचाऱ्यांना तीन हजार अॅडव्हान्स तर सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महापौर सुशीला आबुटे यांनी जाहीर केला.
सानुग्रह अनुदानापैकी दिवाळीसाठी तीन हजार तर डाॅ. आंबेडकर जयंतीसाठी तीन हजार देण्यात येणार आहेत. याची तजवीज करण्यात आर्थिकदृष्ट्या अचडणीतील महापालिकेवरताण असणार आहे.
वेतनासाठी १७ कोटी रुपये लागतील असे एकूण २३ कोटी रुपये दिवाळीसाठी लागणार आहेत. मनपाकडे १८ काेटी रुपये आहेत. पाच कोटी रुपये कमी पडणार आहे. चार ते पाच दिवसांत वसुली होईल असा अंदाज आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान अॅडव्हान्स मिळावा म्हणून कर्मचारी संघटनेची मागणी होती. त्यानुसार महापौर सुशीला आबुटे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्याशी बंद खोलीत चर्चा करून निर्णय घेतला. परिवहन विभागासह मनपा कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान सहा हजार (मागील वर्षी पाच हजार)तर अॅडव्हान्स दोन टप्प्यांत सहा हजार (मागील वर्षी तीन) रुपये. रोजंदारी, शिवणवर्गसह इतर कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान सहा तर अॅडव्हान्स तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी उपमहापौर प्रवीण डोंगरे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया, कामगार संघटनेचे अशोक जानराव, भारत वडवेराव, जनार्दन शिंदे आदी उपस्थित होते. श्रीशैल गायकवाड यांना हा निर्णय मान्य नाही. त्यांनी मंगळवारी मनपा बंदची हाक दिली, पण यात कोणीही सामील होऊ नये असे आवाहन इतर संघटनांनी केले आहे.

चर्चा जोरदार
सानुग्रह अॅडव्हान्स मागणी सर्वच कामगार संघटनेची होती. सोमवारी निर्णय जाहीर होणार असल्याने यांचे श्रेय घेण्यासाठी काही संघटना पुढे सरसावल्या. महापौरसह इतर पदाधिकारी समवेत बंद खोलीत जोरदार चर्चा झाली.
बातम्या आणखी आहेत...