आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुका नगरपालिकेच्या, आचारसंहिता महापालिकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचा निवडणुकीचा बिगूल वाजला. मात्र, त्याची आचारसंहिता महापालिकेपर्यंत लागली आहे. त्यामुळे शहराच्या विकासकामांवर परिणाम होणार आहे. ही आचारसंहिता नोव्हेंबरअखेरला संपता संपता लगेच जानेवारीच्या सुरुवातीला महापालिकेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. याचा फटका शहरातील नागरिकांना बसणार आहे.
नगरपालिकांच्यानिवडणुकीसाठी पूर्ण जिल्ह्याला आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. याची घोषणा सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना झाली. येत्या २७ नोव्हेंबर रोजी मतदान तर २८ रोजी मतमोजणी होणार आहे. २४ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत निवडणूक अर्ज सादर करणे, नोव्हेंबर रोजी छाननी तर ११ नोव्हेंबर अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत राहणार आहे. यंदा निवडणूक आयोगाने प्रथमच ज्या जिल्ह्यात चारपेक्षा अधिक नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्याठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहणार आहे. यामुळे पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांना वाहने जमा करावी लागणार आहेत.

कामे थांबतील
^महापालिका निवडणुका आहेत, त्यामुळे रखडलेली कामे होणे आवश्यक आहेत. नोव्हेंबरपर्यंत आचारसंहिता असल्याने जानेवारी महिन्यात पुन्हा आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे डिसेंबर एका महिन्यात कामे कसे होतील. आचारसंहितेमुळे विकास कामावर परिणाम होईल.” नरेंद्रकाळे, विरोधी पक्षनेता, महापालिका
^चारपेक्षा जास्तनगरपालिकेच्या निवडणुका असल्याने जिल्ह्यात अाचारसंहिता आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली. त्यांच्याकडून मंगळवारी रीतसर पत्र येईल. शहरात अाचारसंहिता आहे. त्यामुळे त्यांचे पालन करावे लागेल.” विजयकुमार काळम-पाटील, आयुक्त, महापालिका

तेथील मतदार तर शहरात नाहीत
^नगरपालिका निवडणुका शहरापासून ४० किमी अंतरापेक्षा लांब आहे. तेथील मतदार शहरात नसतात, त्यामुळे शहरात अाचारसंहिता लावल्यास विकास कामांवर परिणाम होतो. हे चुकीचे आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊन बोलेन.” प्रा.सुशीला आबुटे, महापौर

भरावे लागणार ऑनलाइन अर्ज
निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. शिवाय आयोगाच्या आदेशानुसार शपथपत्राच्या मूळ प्रती निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करावी लागणार आहे. जातपडताळणीसाठी अर्ज केलेली पोहच पावतीही अर्जासोबत द्यावी लागणार आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धती राबवण्यात येत आहे.
बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, करमाळा, कुर्डुवाडी, सांगोला, मंगळवेढा, मैंदर्गी दुधनी

{एका नगरपालिकेसाठी उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी तर मुख्याधिकारी सहायक निवडणूक अधिकारी
{निवडणुकीवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती
{यंदा प्रथमच बहुसदस्यीय जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने एका मतदारास तीन मतदान करण्याचा अधिकार
{नगरपालिका निहाय भरारी पथक, तपासणी नाके नियंत्रण कक्षाची करणार स्थापना
{निवडणूक खर्चामध्ये आयोगाने यंदा वाढ केली असून वर्ग नगरपालिकेसाठी लाख, वर्गातील नगरपालिकेसाठी लाख तर वर्ग नगरपालिकेसाठी दीड लाख रुपये मर्यादा केली आहे. यापूर्वी उमेदवारांना ४५ हजार रुपयांपर्यंतची मर्यादा होती
{८०० मतदारांमागे असणार एक मतदान केंद्र

शहरात आचारसंहिता नको, फेरविचार व्हावा
^नगरपालिका निवडणुकांचा शहराशी काही संबंध नसतो, त्यामुळे शहरात आचारसंहिता लावणे चुकीचे आहे. निवडणूक आयोगाने याबाबत पुनर्विचार करावा. वस्तुस्थिती पाहून निर्णय घ्यावा. पदाधिकाऱ्यांच्या गाड्यापेक्षा विकास कामावर परिणाम झाल्यास त्यांचा फटका नागरिकांना बसतो.” आनंद चंदनशिवे, नगरसेवक, बसप
बातम्या आणखी आहेत...