आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका निवडणूक रणधुमाळीच्या पहिल्या दिवशी वातावरण थंडच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - जिल्हाभरातील नगरपालिकांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रशासकीय पातळीवर सोमवारी (दि. २४) प्रारंभ झाला आहे. माहिती पुस्तिका खरेदीसाठी तसेच माहिती विचारण्यासाठी जिल्हाभरातील पालिका निवडणूक विभागात इच्छुकांसह पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. मात्र, जिल्हाभरात नगरसेवक अथवा नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.
उमरगायेथे नगरसेवक पदासाठी १७ तर नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून पहिल्या दिवशी माहितीचा दस्त खरेदी :उमरगा नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारी पहिल्या दिवशी नगरसेवक पदासाठी एकूण १७ जनांनी २४ माहितीचे अर्ज खरेदी केले. तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण जणांनी माहिती अर्जांची खरेदी केली. येथील अंतुबळी सभागृहात निवडणूक विभागाच्या कार्यालयात नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या अर्जासाठी भाजपाच्या शारदाबाई ईगवे, काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेविका संगीता कडगंचे, शिवसेनेच्या नगरसेविका सुनीता सुरवसे, माजी नगरसेविका सायराबानू अत्तार यांनी मािहती अर्ज खरेदी केले. अद्याप एकही आॅनलाइन अर्ज दाखल झालेला नाही. प्रत्येक पक्षाने सध्यातरी एकला चलो रे चा नारा देत आपापल्या गटातील कार्यकर्त्यांना प्रत्येक प्रभागातून संधी देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येकांना प्रभागनिहाय उमेदवारी देण्याचे आश्वासन देखील देण्यात येत आहे. मात्र ऐनवेळी पक्षांची आघाडी किंवा युती झाल्यास मोठ्या प्रमाणात अर्ज माघारी घ्यावे लागणार असून, यामध्ये बऱ्याच इच्छुकांची मने दुखावणार आहेत. तसेच जिल्ह्यातील कळंब मुरूम नगरपालिकेतही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज सादर झाला नसल्याची माहिती मिळाली. परंतु, विचारपूस करण्यासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती.

परंड्यात ६५ माहितीपुस्तिकेची विक्री :परंडा शहरात नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अॉनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एकूण ६५ माहितीपुस्तिकेची विक्री झाली. परंतु, एकही अर्ज दाखल झाला नाही. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे सहायक अधिकारी स्वरूप कंकाळ यांनी दिली. नगरपालिका निवडणुकांसाठी अॉनलाइन अर्ज विक्री दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी माहिती पुस्तिका विकत घेतली. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठीसाठी अर्ज भरण्याच्या माहितीपुस्तिका तर नगरसेवक पदासाठीच्या ५६ माहिती पुस्तिकेची विक्री झाली. उमेदवारांनी अॉनलाइन माहिती आवश्यक कागदपत्र सादर करून त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अनामत रक्कम भरणा करून सूचक यांची स्वाक्षरी घेऊन सादर करावा लागणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी हजार रुपये तर नगरसेवक पदासाठी सर्वसाधारण गटाला हजार तर मागासप्रवर्गासाठी ५०० रुपये अनामत भरावी लागणार आहे. अपक्ष उमेदवारास सूचक लागणार असून, पक्षाच्या उमेदवारास एका सूचकाची स्वाक्षरी आवश्यक आहे.

पडताळणीवरून गाेंधळ
उस्मानाबादयेथे जातपडताळणी होत नसल्याने एसटी एससीच्या इच्छुकांची मोठी धावपळ होत आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना जात प्रमाणपत्राची पडताळणी झालेली असणे अथवा विभागीय समितीकडे अर्ज दाखल असणे आवश्यक आहे. परंतु, लातूर येथून आता अर्ज स्वीकारण्याला नकार होत असल्याचे समजते. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी पडताळणीचा अर्ज स्वीकारण्याची शिफारस करावी अशी मागणी इच्छुकांकडून होऊ लागल्याने थोडावेळ गोंधळ निर्माण झाला होता.

नळदुर्ग येथे उमेदवारांनी आवेदनपत्र दाखल करण्याच्या सोमवारी पहिल्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एकही अर्ज दाखल केला नाही. प्रथमच उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरून त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून निवडणूक विभागाकडे सादर करायची आहेत. पालिकेत अाचारसंहिता कक्ष, उमेदवार मदत कक्ष, तक्रार निवारण कक्ष, एक खिडकी विविध परवाने कक्ष स्थापना करण्यात आली आहे.
उस्मानाबादेत गर्दी
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद नगर पालिकेच्या नाट्यगृहामध्ये प्रशासनाकडून निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी (दि.२४) माहितीचा बंच विक्री उमेदवारी दाखल करण्यास प्रारंभ झाल्यानंतर पालिकेच्या आवाराला जत्रेचे स्वरूप आले होते. उस्मानाबाद पालिकेसाठी ३९ नगरसेवक नगराध्यक्ष निवडूण द्यायचा आहे. यामध्ये इच्छुकांकडून विविध स्वरुपाची माहिती विचारणे, माहितीचा बंच घेणे आदी प्रक्रिया पार पडल्या.

तुळजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांचा एकमेव उमेदवारी मागणी अर्ज आल्याने त्यांची राष्ट्रवादीकडूनची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तसेच सोमवारी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचेे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. अर्चना गंगणे या २०११ मध्ये नगराध्यक्षा होत्या. या वेळी पक्षाकडे त्यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला आहे. तसेच पालिकेच्या २० नगरसेवक पदासाठी ७७ जणांनी दिवसभरात राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केलीे. तसेच विराेधातील सर्वपक्षीय आघाडीचीही धार बोथट झाल्याचे दिसत असून, प्रमुख पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...