आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचनेस अाज निवडणूक आयोग देणार मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होत अाहे. महापालिकेने २६ प्रभागांची रचना तयार केली अाहे. प्रारूप प्रभाग रचनेस (अनुसूचित जाती जमातींसाठी अारक्षित प्रभागांसह) राज्य निवडणूक अायोग शुक्रवारी मान्यता देणार अाहे. विभागीय आयुक्तांनी केलेल्या दुरुस्तीनंतर प्रभाग रचनेचे प्रारूप राज्य निवडणूक कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. प्रभाग रचना अारक्षण अाॅक्टोबर रोजी जाहीर झाल्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती मागवल्या जातील.
चार सदस्यांचे २४ तर तीन सदस्यांचे दोन असे २६ प्रभाग पालिका निवडणूक कार्यालयाने अायोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तयार केले अाहेत. निवडणूक आयोग तपासणी करून प्रारूपास मान्यता देईल. सात आॅक्टोबर रोजी आरक्षण सोडत सोलापुरात काढण्यात येणार आहे. त्यानंतर दहा आॅक्टाेबर रोजी प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर २५ आॅक्टोबर पर्यंत प्रभाग रचनेवर सूचना हरकती मागवल्या जातील. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल, असे पालिका उपायुक्त श्रीकांत म्याकलवार यांनी सांगितले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची प्रशासकीय तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. आयोगाच्या आदेशानुसार गट गण रचना करण्यात आली आहे. प्रारूप रचनेचा प्रस्ताव गुरूवारी विभागीय आयुक्तांना सादर झाला. ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणांचे तालुकानिहाय आरक्षण काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद गटाचे तर उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती गणासाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. ही प्रक्रिया तहसीलस्तरावर राबवली जाईल. तालुकानिहाय उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी करणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांनी मंजूर केलेल्या प्रारूप गट गण रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...