आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची मोर्चेबांधणी, मंत्र्यांकडे जबाबदाऱ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार शरद बनसोडे आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुुख यांच्याकडे जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार बैठका सुरू झाल्या आहेत. दरम्यान, नगरपालिकेसाठी युतीची घोषणा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
जिल्हातील नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, प्रदेश पातळीवर युती झाल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. त्यामुळे स्थानिक पातळीवर युतीच्या नेत्यात पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. बार्शीत युती झाल्यास सत्ता येण्याचा मार्ग सुकर होणार आहे. कुर्डुवाडीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे तेथे भाजपस फायदा होईल. पंढरपुरात परिचारकांचे वर्चस्व आहे. ते भाजपला जवळचे असल्याने भाजपमुळे शिवसेनेस फायदा होईल. मंगळवेढा येथे अवताडे यांचे वर्चस्व असल्याने त्यामुळे भाजपास फायदा होईल. मैंदर्गी, दुधनी येथे शिवसेनेचे वर्चस्व कमी असले तरी भाजपची विशेषत: खासदार बनसोडे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील पालकमंत्री देशमुख यांच्या भूमिकेवर सर्वकाही अवलंबून आहे. अक्कलकोट शहरात शिवसेना मानणारा वर्ग आहे.

नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने जबाबदारी निश्चीत केली आहे. त्यानुसार अक्कलकोट, मैंदर्गी दुधनीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि खासदार शरद बनसोडे यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पंढरपूरसाठी आमदार प्रशांत परिचारक, खा. बनसोडे आणि मंगळवेढ्याची जबाबदारी बनसोडे यांच्यावरच राहील. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे सांगोला, करमाळा, बार्शी, कुर्डुवाडीसह उस्मानाबाद येथील पंधरा नगरपालिकांच्या निवडणुकीची जबाबदारी राहील. याशिवाय भाजपाचे तिन्ही नेते जिल्ह्यात प्रचार दौरा करतील.

शहरात युतीसाठी सकारात्मक
^महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती व्हावी यासाठी भाजप सकारात्मक आहे. युतीचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेश नेत्यांनी स्थानिक नेत्यांवर सोपवला आहे. शहरात युती होईल. शिवसेना नाराज असेल तर चर्चेतून मार्ग काढू.'' प्रा.अशोक निंबर्गी. शहराध्यक्ष, भाजप

मानहानी पत्करून युती कशाला करायची ?
^सोलापुरात भाजप शिवसेनेला विश्वासात घेत नाही. विधानसभानिहाय संजय गांधी निराधार योजना गठित झाल्या. त्यात शिवसेनेच्या एकाही कार्यकर्त्याला संधी दिली नाही. एवढी मानहानी पत्करून युती करायची कशाला? स्वबळावर लढण्याची आमची तयारी सुरू झाली आहे. त्याच्या चाचपणीत दोनशे महिलांचे अर्ज आले. प्रदेश पातळीवर युतीचा निर्णय झाला तरी सोलापुरातील स्थितीची माहिती श्रेष्ठींना देऊ.'' महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

दोन पाऊल मागे घेऊन पुन्हा चर्चा
^नगर पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरू आहे. युती संदर्भात प्रदेश पातळीवरून निर्णय झाल्यास तसे आम्हाला कळवल्यास, दोन पावले मागे घेऊन शक्य त्या ठिकाणी शिवसेनेशी चर्चा करू. काँग्रेस, राष्ट्रवादी वगळून आम्ही इतर सक्षम पक्षाशी युती करण्याचा विचार आहे.'' शहाजी पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष
बातम्या आणखी आहेत...