आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरतीत दुजाभाव, मनपा आयुक्तांच्या विरोधात तरुणाची न्यायालयात धाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका अग्निशमन दलात ऑक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या रिक्त जागा भरतीमध्ये दुजाभावाची वागणूक देऊन पात्र असतानाही डावलण्यात आले. याबाबत मनपा आयुक्तांकडे तक्रार करूनही दखल घेतल्याने त्यांच्याविरुद्ध अहमदनगर येथील युवक अंकुश बंडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे अग्निशमन दलातील भरती संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

महापालिका अग्निशमन दलातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात अाले होते. सुमारे ८५० जणांनी अर्ज केले असून १५० उमेदवार पात्र ठरले. त्यानंतर शारीरिक लेखी परीक्षा मनपा निवड समितीच्या वतीने घेण्यात आली. त्यातून २४ जणांची निवड केली, त्यापैकी २२ जण हजर झाले. अहमदनगर येथील अंकुश बंडे भरतीसाठी उभा होता. त्याची उंची १६७ पेक्षा जास्त असताना १६३ दाखवण्यात आली. त्यामुळे पात्र असताना निवड होऊ शकली नाही. याबाबत मनपा आयुक्तांकडे तक्रार केली. पण, त्याची दखल घेतल्याने माझे नुकसान झाले. त्यामुळे या अन्यायाविरोधात बंडेने उच्च न्यायालयात मनपा आयुक्तांच्या विरोधात याचिका दाखल केली. याची प्रत मनपाला मिळाली असून, मार्च २०१६ मध्ये पुढील सुनावणी होणार आहे.

विधानसभेत आमदार साळुंखेंचा तारांकित प्रश्न
महापालिका अग्निशमन दलाच्या भरतीप्रकरणी आमदार दीपक साळुंखे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यास मनपाकडून उत्तर देण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्तांनी मागितला अहवाल
महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाकडून एक डिसंेबरपर्यंत अहवाल मागितले. तो अहवाल अद्याप तयार झाला नाही. भरतीतील तिघांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार केली. त्यांची उंची शासकीय रुग्णालय, पोलिस आयुक्तांकडून मोजण्यात आली. बंडे यापूर्वी मुंबई येथे भरतीसाठी उभे होते. तेथे मोजलेली उंची १६८ असताना सोलापुरात उंची कमी कशी केली? उंची मोजण्यासाठी कोण होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुन्हा उंची मोजण्याचे दिले आहेत आदेश
^बंडे हे न्यायालयात गेले आहे असे सांगण्यात आले, पण त्यावर रजिस्टर नंबर नाही. त्याची उंची मोजण्यासाठी तीन विभागांना पत्र दिले आहे. त्याचा अहवाल आल्यावर आयुक्तांपुढे सादर करू. विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला आहे त्याचे उत्तर देऊ.'' अमिता दगडे-पाटील, सहाय्यकआयुक्त, मनपा प्रशासन

महापालिका रीतसर उत्तर सादर करेल
^उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी रीतसर उत्तर आम्ही न्यायालयात सादर करू. तक्रारदारांनी आमच्याकडे येऊ द्या. नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. '' विजयकुमार काळम, आयुक्त
बातम्या आणखी आहेत...