आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पन्नाचे विषय टाळून, स्मार्ट सिटी सदस्यांवरच पुन्हा चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकणाऱ्या डिजिटल फलक जाहिरातीविषयी धोरणात्मक निर्णय, बांधकाम परवाने आदी विषय चर्चेसाठी असताना त्यास बगल देत स्मार्ट सिटीच्या विषयावर राजकीय चर्चा झाली. त्याशिवाय इतर २८ विषयांवर फारशी चर्चा करता प्राधान्याने विषय संपवून सभा तहकूब करण्यात आली.
महापालिकेची आॅगस्ट महिन्यातील तहकूब सभा सोमवारी महापौर सुशीला आबुटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तुळजापूर रोडवरील कचरा महापालिकेने साफ केल्याने नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी महापालिका प्रशासनाचा अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीसाठी दोन सदस्य देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी पाठवला हाेता. तो प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावत आठ मार्च रोजी केलेला ठराव कायम करण्यात आला. त्यावेळी केलेल्या ठरावात काँग्रेसचे अॅड. यू. एन. बेरिया, चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे तर भाजपचे जगदीश पाटील यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. त्यास शासनाने हरकत घेतली.

कंपनीच्या संचालक मंडळात सर्व राजकीय पक्षांना समावेश करण्याचा हेतू स्पष्ट केला. पदाधिकारी मधील राजकीय पक्षांना वगळून उतरत्या क्रमाने दोन राजकीय पक्षाच्या सदस्यांना संधी द्या, अशी सूचना केली. त्यानुसार आयुक्तांनी प्रस्ताव पाठवला. याप्रमाणे विरोधी पक्षाने उपमहापौर प्रवीण डोंगरे, शिवसेनेचे महेश कोठे यांचे नाव सुचवले. त्यास सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत मागील ठराव कायम करण्याचा निर्णय घेतला. या विषयावर नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी भाजपवर आरोप करत राजकारण करत असल्याचा आरोप केला.

बसप राष्ट्रीय पक्ष असून, या पक्षास भाजप डावलत असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे अनिल पल्ली आणि अॅड. यू. एन. बेरिया यांनी राज्य सरकार सोयीचे होते ते करत आहे. सभागृहाने यापूर्वी केलेला ठराव विखंडित करता नव्याने आदेश देत आहे. महापालिकेचा अधिकार कमी केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

आयुक्तांनी सादर केलेल्या विषयांना बगल
महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठीे बांधकाम परवानगीचा विषय त्याबाबत माहितीस्तव आयुक्तांनी सभागृहाकडे पाठवला आहे. निवासी इमारतीत दोन टक्के, औद्योगिक तीन तर वाणिज्य इमारतीसाठी चार टक्के प्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे. माहितीस्तव विषय असताना तो विषय सभागृहाने प्राधान्याने घेतला नाही. महापालिका हद्दीत डिजिटल फलक लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियमावली केली. त्यावर धोरणात्मक निर्णय झाले असते तर मनपाच्या उत्पन्न वाढीस चालना मिळाली असते. सदरचा विषय प्राधान्यक्रमांत नव्हता. नगरपालिका निवडणुकीची अाचारसंहिता लागल्याने यापुढे निर्णय करताना अडचणी येणार आहेत. उत्पन्नाच्या विषयावर निर्णय घेता, स्मार्ट सिटी कंपनीच्या दोन संचालक निवडीवरून युती सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न मनपा सभेत झाला.

भाजपवर सभेत टीकाटिप्पणी
महापालिका सभागृहात भाजपच्या वतीने ठोस भूमिका मांडण्यास युतीचे नगरसेवक पुढे आले नाही. नगरसेवक सुरेश पाटील, प्रा. अशोक निंबर्गी गैरहजर होते तर नगरसेवक जगदीश पाटील हे उपस्थित असून, चर्चेत सहभागी झाले नाही. याचा फायदा घेत बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, काँग्रेसचे नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया, अनिल पल्ली यांनी भाजप सरकारवर टीका केली.
बातम्या आणखी आहेत...