आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आता शहरातील पाणीचोरीही शोधणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी जलवाहिनीतून पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर आता शहरातील पाणीचोरीविरोधात मोहीम सुरू करण्याची योजना महापालिकेकडून आखण्यात येत आहे. उजनी जलवाहिनीतून चाेरी केल्याप्रकरणी १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांसह २६ जण या प्रकरणात संशयित आरोपी आहेत.
१४ ठिकाणी मिळून जलवाहिनीतून सुमारे १८ इंची पाण्याची चोरी सुरू होती. त्यातून रोज सुमारे दशलक्ष लिटर पाण्याची चोरी मागील दोन वर्षांपासून सुरू होती. हा प्रकार म्हणजे पाणीचोरीचे स्कँडल असल्याचे मत महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. यापुढील काळात पाणीचोरी उघड करण्याची अशाच प्रकारची मोहीम शहरात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उजनी ते सोलापूर या जलवाहिनीतून पाण्याची चाेरी होत असल्याचे पुरावे असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी २२ जुलै रोजी दिली. त्यानुसार रात्री नियोजन करून दोन दिवसांची मोहीम चालवण्यात आली. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या मदतीने ही मोहीम यशस्वी झाल्याचे काळम पाटील म्हणाले. १४ गुन्ह्यांत महापालिकेचे किसन कापसे, ज्योतिबा काकडे या दोघांसह २६ जण संशयित आरोपी आहेत. चार कोटी ९० लाख ३८ हजार १४० रुपयांची पाणीचोरी झाली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर बोजा चढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करणार असल्याचे काळम पाटील यांनी सांगितले.

बाळेजवळीलगळती चौथ्या दिवशीही सुरूच : बाळेयेथील मडकी वस्तीजवळ उजनी जलवाहिनीस गुरुवारी लागलेली गळती शनिवारीही सुरूच होती. महापालिकेकडे गळती थांबवण्यासाठीचे साहित्य नसल्याने शनिवारीही काम पूर्ण होऊ शकले नाही. गळतीच्या ठिकाणी दिवसांपास्ून २५ इंच पाणी वाया जात आहे. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. काही भागात चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत काम सुरू होईल, अशी माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आर. एन. रेड्डी यांनी दिली.
मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांची माहिती

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी जलवाहिनीतून पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर आता शहरातील पाणीचोरीविरोधात मोहीम सुरू करण्याची योजना महापालिकेकडून आखण्यात येत आहे. उजनी जलवाहिनीतून चाेरी केल्याप्रकरणी १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांसह २६ जण या प्रकरणात संशयित आरोपी आहेत.
१४ ठिकाणी मिळून जलवाहिनीतून सुमारे १८ इंची पाण्याची चोरी सुरू होती. त्यातून रोज सुमारे दशलक्ष लिटर पाण्याची चोरी मागील दोन वर्षांपासून सुरू होती. हा प्रकार म्हणजे पाणीचोरीचे स्कँडल असल्याचे मत महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. यापुढील काळात पाणीचोरी उघड करण्याची अशाच प्रकारची मोहीम शहरात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उजनी ते सोलापूर या जलवाहिनीतून पाण्याची चाेरी होत असल्याचे पुरावे असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी २२ जुलै रोजी दिली. त्यानुसार रात्री नियोजन करून दोन दिवसांची मोहीम चालवण्यात आली. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या मदतीने ही मोहीम यशस्वी झाल्याचे काळम पाटील म्हणाले. १४ गुन्ह्यांत महापालिकेचे किसन कापसे, ज्योतिबा काकडे या दोघांसह २६ जण संशयित आरोपी आहेत. चार कोटी ९० लाख ३८ हजार १४० रुपयांची पाणीचोरी झाली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर बोजा चढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करणार असल्याचे काळम पाटील यांनी सांगितले.

बाळेजवळीलगळती चौथ्या दिवशीही सुरूच : बाळेयेथील मडकी वस्तीजवळ उजनी जलवाहिनीस गुरुवारी लागलेली गळती शनिवारीही सुरूच होती. महापालिकेकडे गळती थांबवण्यासाठीचे साहित्य नसल्याने शनिवारीही काम पूर्ण होऊ शकले नाही. गळतीच्या ठिकाणी दिवसांपास्ून २५ इंच पाणी वाया जात आहे. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. काही भागात चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत काम सुरू होईल, अशी माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आर. एन. रेड्डी यांनी दिली.
नेमणार दोन पथके

पाणीचोरीप्रकरणी उपअभियंता विजय राठोड यांची चौकशी सुरू आहे. पाणीचोरांच्या गळ्यात पाट्या अडकवल्या पाहिजेत. हा प्रकार यापूर्वीच नियंत्रित करणे आवश्यक होते. पण यापुढे ते काम केले जाईल. उजनी आणि टाकळी जलवाहिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन पथक नेमण्यात येईल, अशी माहिती काळम पाटील यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात महाचोरांवर करणार कारवाई
शहरातहीमोठ्या प्रमाणात पाणीचोरी होते. त्यामुळे आगामी काळात शहरातील पाणीचोरीची शोधमोहीम राबवण्यात येईल. पहिल्या टप्प्यात महाचोर पकडण्यात येतील. पाणीचोरी होत असेल तर त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल. अन्यथा त्यांच्या घरावर बोजा चढवणे आदी कारवाई करण्यात येईल. शहरातील पाणीचोरी शोधण्यासाठी काय करणार, याविषयी आताच सांगणार नाही. कारवाई करून दाखवू, असे विजयकुमारकाळम-पाटील, आयुक्त