आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त आपत्कालीन रस्त्याबाबत पोलिस आयुक्तांच्या बैठकीतही झाले नाही एकमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मार्केट पोलिस चाैकी ते हरिभाई देवकरण प्रशाला मार्गावर पोलिस अायुक्त दालनात झालेल्या बैठकीत एकमत झाले नाही. व्यावसायिक दुकानांपेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य राहील. रस्त्यावर दुकाने थाटता येणार नाहीत. दुकानापोटी घेण्यात येणारे भाडे मंदिर समीतीकडे जमा करता, शासनाकडे जमा करण्यात यावे. एनअोसी घेतल्याशिवाय दुकान उभारण्यासाठी परवानगी मिळणार नाही अशा सूचना पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर, महापालिका अायुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ग्रामदैवत सिध्दरामेश्वर यात्रेच्या नियोजनासाठी सोमवारी पोलिस अायुक्त यांच्या दालनात यात्रा पंच कमिटी, महापालिका प्रशासन पोलिस अधिकारी यांची संयुक्तपणे बैठक झाली. होम मैदानावर नव्याने तयार करण्यात अालेला रस्त्यावरून एकमत झाले नाही. तो रस्ता पंचकमिटीला पाहिजे. प्रशासनाला अापत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी तो रस्ता मोकळा पाहिजे. यात एकमत झाले नाही.त्यावर लवकरच अंतिम तोडगा काढण्यात येणार अाहे.

मनपा नगरअभियंता लक्ष्मण चलवादी, डाॅ. जयंती अाडके, जगदीश पाटील, चिदानंद वनारोटे, रामकृष्ण नष्टे, व्ही. एस. अाळंगे, राजशेखर हिरेहब्बू, गुंडप्पा कारभारी, संजय थोबडे, पोलिस उपायुक्त बाळकृष्ण रजपूत, सहाय्यक अायुक्त महिपती इंदलकर उपस्थित होते.

आपत्कालीन रस्त्याची अट घालूनच होम मैदान देणार
श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी दरवर्षाप्रमाणे महापालिकेच्या ताब्यातील होम मैदान १५ डिसेंबर ते ३१ जानेवारीपर्यंत सिद्धेश्वर मंदिर समितीच्या ताब्यात देणार आहे. त्यासाठी आपत्कालीन रस्त्याची अट घालण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांनी दिली. अापत्कालीन रस्त्याची लेखी हमी घेतल्यानंतर होम मैदान मंदिर समितीच्या ताब्यात दिले जाईल.

मंदिर समिती कार्यालयाचे आज उद्घाटन
यात्रेतील स्टॉल बुकिंगकरता मंदिर समिती कार्यालयाचे उद््घाटन मंगळवारी होत आहे. पंचकट्टा परिसरात सकाळी १० वाजता याचा शुभारंभ होत असून यावेळी विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. यंदा प्रथमच दोन ठिकाणी कार्यालये सुरू होणार होती. परंतु पालिका पोलिस प्रशासनाच्या सहकार्यातून तोडगा निघाल्याने केवळ पूर्वीच्याच ठिकाणी एक कार्यालय सुरू होणार आहे. यंदाही २५० ते ३०० स्टॉल असतील, असे काडादी यांनी सांगितले .

दुसऱ्या कार्यालयाचे उदघाटन रद्द
मार्कट पोलिस चाैकीजवळील रस्त्यावर मंगळवारी पंच कमिटीतर्फे कार्यालयाचे उदघाटन होणार होते. ते रद्द करण्यात अाल्याची माहिती काडादी यांनी दिली.

दुकानांपेक्षा सुरक्षिततेला महत्त्व
^अापत्कालीन रस्ता म्हणून त्या मार्गाचा वापर करणार अाहोत. त्यामुळे अामच्यासाठी नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची अाहे. होम मैदानावरील पोलिस चाैकी बाजूला हटवू. ती जागा पंचकमिटीने वापरावी. स्टाॅल लावताना पोलिसांची अगोदर एनअोसी घ्यावी, नंतर मनपाची घ्यावी तरच स्टाॅल उभारता येईल. अक्षता सोहळा यात्रेत अाम्ही दक्षता घेणार अाहे. रस्ते मोकळेच पाहिजे.'' रवींद्र सेनगावकर, पोलिसअायुक्त

स्टॉल भाडे शासनाकडे जमा होणार
^नव्यानेतयारकेलेला रस्ता १९७८ पासून अाहे. तशी कागदपत्रे अापल्याकडे अाहेत. तो रस्ता बेकायदेशीर नाही. कायद्याप्रमाणेच काम अाहे. होम मैदान स्टाॅलसाठी द्यायचे की नाही याबाबत कायदेशीर माहिती घेत अाहोत. मंदिर समितीला दोन-तीन मार्गांचा पर्याय दिला अाहे. स्टाॅलच्या माध्यामातून येणारी रक्कम शासनाकडे जमा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले अाहे. ते पत्र अाम्ही देवस्थान पंच कमिटाला दिले अाहे.'' विजयकुमार काळम-पाटील, मनपाअायुक्त
सोमवारी झालेल्या बैठकीत पोलिस आयुक्त सेनगावकर, मंदिर समितीचे पदाधिकारी.

त्या रस्त्याबाबत तोडगा निघेल
^आपत्कालीन रस्त्याबाबतचर्चा सुरू आहे. दोन-तीन रस्त्यांचा पर्याय समोर अाला अाहे. त्यावर येत्या अाठवड्यात तोडगा निघेल. अाजची चर्चा सकारात्मक झाली आहे. या प्रश्नावर मार्ग काढण्यात येईल.'' धर्मराज काडादी, समितीअध्यक्ष
बातम्या आणखी आहेत...