आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग पाचमधील रस्त्याच्या उद्घाटनाचा दुसऱ्यांदा घाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकाप्रभाग क्रमांक पाचमध्ये नगरोत्थान रस्ते विकास कामाचा प्रारंभ नगरसेविका अंबिका पाटील यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्याच रस्त्याच्या कामाचा प्रारंभ नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या प्रयत्नातून पुन्हा करण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक पाचमधील भाजपचे नगरसेवक वल्याळ आणि पाटील यांच्यात कामाचे श्रेय आणि मानपानावरून स्पर्धा सुरू अाहे. यापूर्वीही भवानी पेठ परिसरात रस्ते कामाचा प्रारंभ दोनदा झाला होता. तेव्हा नगरसेविका पाटील यांनी भाजपचे शहराध्यक्ष प्रा. निंबर्गी यांच्या हस्ते उद्घाटन केले. या कामाच्या नामफलकातून नगरसेवक वल्याळ यांचे नाव वगळण्यात आले होते.

आता पुन्हा त्याच प्रभागात नगरोत्थान रस्ते कामाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी मात्र वल्याळ यांच्या नावाचा समावेश फलकावर करण्यात आला आहे. मात्र नगरसेवक वल्याळ यांना हे मान्य नसून, त्या रस्त्याचे उद्घाटन पुन्हा करणार असल्याचे वल्याळ यांनी सांगितले. त्यामुळे एकच रस्त्याचे दोनदा उद्घाटन होणार आहे.