आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३२० कोटी थकबाकी, ६४ कोटी वसूल करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेतील कर आकारणी, गवसु आणि हद्दवाढ विभाग मिळून ३२० कोटी थकबाकी असून, त्यापैकी २० टक्के इतके ६४ कोटी रुपये आठ दिवसांत वसूल करा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार अशी माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली. महापालिका वसुलीबाबत आयुक्तांनी गुरुवारी बैठक घेतली. लिपिकांनी वसूल केलेली रक्कम, त्यांंना नेमून दिलेला भाग याबाबत आढावा घेत विचारणा केली. २३ विभागाचा वसुलीचा आढावा घेतला. ५० हजार पुढील मिळकतदारांवर कारवाई करावी. त्यानंतर त्यांच्याकडून वसुली करावी. कोटींच्या पुढील थकबाकीदारांची यादी द्यावी. त्यावर मी निर्णय घेतो, असे आयुक्तांनी सांगितले.
थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई : मिळकतकर थकबाकीदार असतील त्यांच्या मिळकतीवर बोजा चढवून जप्तीची कारवाई करावी, असा आदेश मनपा आयुक्तांंनी दिला.
२०५कोटी मागील थकबाकी : सन२०१६-१७ या आर्थिक वर्षापूर्वीचे २०५ कोटी थकबाकी असून, त्यात अनेक बिले दोनवेळा पाठवले आहेत. चालू वर्षाची १०५ कोटी थकबाकी आहे. सप्टेंबर अखेर ६५ काेटी वसूल झाले. अन्य रक्कमपैकी आठ दिवसांत २० टक्के रक्कमा वसूल करावी. महापालिकेच्या उद्दिष्टापैकी २१.४० टक्के वसुली झाली आहे.

रिकाम्याप्लाॅट धारकांवर मनपाचे नाव : हद्दवाढभागात अनेक खुल्या प्लाॅटमालकांचा शोध लागत नाही. त्यांची नावे शोधा. मालक मिळत नसतील तर त्यांच्या मिळकतीवर थकबाकीपोटी मनपाची नाव नोंदणी करा असा, आदेश महापालिका आयुक्तांनी कर आकारणी विभागास दिला.

^आठ दिवसांत२० टक्के रक्कम वसुलीचे आदेश दिले आहेत. वसुली केल्यास कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी थकबाकी भरावी. विजयकुमार काळम-पाटील, मनपा आयुक्त

असे आहे उद्दिष्ट
कंसातवसुली रक्कम कोटीत
शहर : १९० (४१)
हद्दवाढ : ११९ (२५)
गवसु : ९.९२ (१.२३)

राजकीय हस्तक्षेप होतो, त्याचे काय?
महापालिका आयुक्त पदाचा पदभार असताना तुकाराम मुंढे यांनी आठ दिवसांत आठ कोटी वसूल केले. अनेक मिळकती सील केल्या. जप्तीची कारवाई सुरू केली. त्यास स्थायी समितीने स्थगिती दिली आणि हप्त्याने रकमा घेण्याचे आदेश दिले. जप्तीची कारवाई करत असताना राजकीय हस्तक्षेप होतो त्याचे काय?
बातम्या आणखी आहेत...