आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Murder Attempt On Collector Of Solapur Sudam Munde

अंगावर ट्रक घालून सोलापूरचे जिल्हाधिकारी मुंढेंना जिवे मारण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी (जि. साेलापूर) - वाळू तस्करांविराेधात कठाेर कारवाई करणारे साेलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना अंगावर ट्रक घालून जिवे मारण्याचा प्रयत्न बुधवारी सकाळी करण्यात अाला. सुदैवाने त्यांना काेणतीही इजा झाली नाही.

वाळू तस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी मुंढे, तलाठी व काही कर्मचारी कुर्डुवाडी- शेटफळ रस्त्यावर गस्त घालत हाेते. लऊळ (ता. माढा) येथे वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न मुंढेंनी केला. मात्र या चालकाने त्यांच्या अंगावरच ट्रक घालण्याचा प्रयत्न करून पळ काढला. पाठलाग करून त्याला पकडण्यात अाले. याबाबत तलाठी मल्लिनाथ बंड्या स्वामी यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून त्यावरून ट्रकचालकाविराेधात सरकारी कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा अाणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अाला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी
राजकुमार कोळी (लऊळ), राजेंद्र चव्हाण (पिंपळनेर), नागनाथ देवकर (भूताष्ठे) आणि शीतल अवताडे (पडसाळी) या चार तलाठ्यांसमवेत फिर्यादी स्वामी हे गस्त घालत होते. त्या वेळी लऊळ हद्दीतील ढोरे वस्तीजवळ शेटफळहून कुर्डुवाडीकडे जाणारा वाळूचा ट्रक (एमएच १२ सीएच ११६७) भरधाव जात होता. गस्त पथकाने चालकास ट्रक कडेला थांबवण्यासाठी इशारा केला. मात्र त्याने पथकाची सूचना धुडकावून थेट कर्मचाऱ्यांच्या अंगावरच ट्रक घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावर पथकाने तातडीने तहसीलदारांच्या वाहनातून (एमएच ४५ डी ००३८) ट्रकचालकाचा पाठलाग केला व त्याला राेखले. ट्रकचा चालक सचिन भुजंग मिसाळ (वय २७, रा. शिरसाव, ता.परंडा, जि.उस्मानाबाद) याच्याकडे वाळू रॉयल्टीच्या पावतीची मागणी केली. मात्र ताे देऊ शकला नाही. त्यावरून त्याच्या ट्रकमधून बेकायदा वाळू वाहतूक हाेत असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने पंचनामा केला असता या ट्रकमध्ये २२ हजार ५०० रुपये किमतीची साडेचार ब्रास चोरीची वाळू आढळली. ट्रक अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न आणि सरकारी कामकाजात अडथळा केल्याचा गुन्हा मिसाळवर दाखल केला आहे. दरम्यान, स्वामींनी दिलेल्या फिर्यादीत मुंढेंचा उल्लेख नाही. मात्र प्रांताधिकाऱ्यांनी मुंढेंच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला अाहे.

साेलापुरात तक्रार दाखल करणार
जिल्हाधिकारी मुंढे कुर्डुवाडी येथील सरपंच कार्यशाळेस जात होते. रस्त्यात ते वाळू ट्रकची तपासणी करत होते. एका ट्रकच्या चालकाने मुंढे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.तो पळून जात असताना पाठलाग करून त्याला पकडण्यात अाले. या चालकाविराेधात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. रात्री उशिरापर्यंत ट्रकचालकाविरोधात मुंढे पुन्हा साेलापूर पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत.
मनीषा कुंभार, प्रांताधिकारी, कुर्डुवाडी