आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरण: डॉ. प्रसन्ना यांचा जामीन फेटाळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - डाॅ.रश्मी प्रसन्ना अग्रहार यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी डॉ. प्रसन्ना यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला. या प्रकरणातील इतर तीन संशयित आरोपी डॉ. एस. प्रभाकर, डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. भाऊसाहेब गायकवाड यांना जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला.

डाॅ. रश्मी अग्रहार यांचा जुलै २०१५ मध्ये खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. एका निनावी पत्राच्या आधारे पोलिसांनी तपास करून सोलापुरातील नामवंत डॉक्टर आरोपींना ताब्यात घेतले होते. मुख्य संशयित आरोपी डाॅ. प्रसन्ना यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायमूर्ती बदर यांनी फेटाळून लावला. जिल्हा न्यायालयात दाखल झालेल्या अर्जावर न्यायाधीश वि. भा. कंकणवाडी यांच्यासमोर सुनावणी झाली. डॉ. कुलकर्णी, डॉ. गायकवाड डॉ. एस. प्रभाकर हे सर्वजण डॉ. प्रसन्ना यांच्या सांगण्यावरून घटनास्थळी गेले होते. त्यांनी रश्मी यांचा केवळ मृत्यू झाल्या आहे, असे प्रमाणपत्र दिले होते. यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायमूर्ती बदर यांनी फेटाळून लावला. न्यायाधीश विभा कंकणवाडी यांच्यासमोर सुनावणी झाली. डॉ. कुलकर्णी, डॉ. गायकवाड डॉ. एस. प्रभाकर हे सर्वजण डॉ. प्रसन्ना यांच्या सांगण्यावरून घटनास्थळी गेले होते. त्यांनी रश्मी यांचा केवळ मृत्यू झाल्या आहे, असे प्रमाणपत्र दिले होते. डॉ. प्रसन्ना यांनीच रश्मी यांना हृयविकाराचा झटका अाल्याने मृत्यू झाला असे प्रमाणपत्र दिले. डॉ. प्रसन्ना हे डॉ. प्रभाकर यांच्या हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून कार्यरत होते. या तिघांनी मदत केली किंवा षडयंत्र रचले असा पुरावा नाही, या युक्तिवादावरून हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. आरोपींना पोलिस अधिकाऱ्यांनी तपासासाठी बोलावण्यापूर्वी २४ तास आधी नोटीस द्यावी, अशी अटही नमूद करण्यात आली. आरोपीतर्फे अॅड. सत्यम निंबाळकर, अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. इनायतअली शेख, अॅड. प्रशांत नवगिरे, अॅड. भारत कट्टे, अॅड. राज पाटील यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...