आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधांवरून एकाचा खून; आरोपी म्हणाले- ‘आम्ही मारहाण केली, कोणाला सांगायचे आहे ते सांगा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट- चुंगी (ता.अक्कलकोट) येथे शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अनैतिक संबंधांवरून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून झाला. बाबूराव मलप्पा बंडगर (रा.चुंगी, ता.अक्कलकोट) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी प्रभू उर्फ शरणप्पा रामचंद्र कुंभार, रमेश प्रभू उर्फ शरणप्पा कुंभार,भागुबाई प्रभू उर्फ शरणप्पा कुंभार पूजा शरणप्पा कुंभार (सर्व रा.चुंगी ता.अक्कलकोट) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची अक्कलकोट शहर उत्तर पोलिस ठाण्यात नोंद झाली अाहे. मृताची मुलगी अहिल्या बंडगर हिने फिर्याद दिली आहे. 


बाबूराव बंडगर यांना वरील चार आरोपींनी अनैतिक संबंधांच्या कारणावरून प्रभू कुंभार यांच्या घरासमोर मारल्याने डोक्यासह नाकातोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. बाबूराव बंडगर नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री जेवणानंतर घराच्या बाहेर झोपले. कुटुंबीय नऊ वाजण्याच्या सुमारास घरात झोपी गेले. रात्री साडेअकरा वाजता बाबूराव यांच्या मुलाचा आईच्या मोबाइलवर फोन आला, त्याने कळविले की वडील बाबूराव हे जखमी अवस्थेत प्रभू कुंभार यांच्या घरासमोर पडले आहेत, असे सरपंच अप्पा गड्डे यांनी कळविले, असा मुलाने आईला निरोप दिला. मुलगा सांगली येथे खासगी कंपनीत काम करतो. निरोपानंतर बाबूरावची पत्नी मायादेवी मुलगी अहिल्या यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता बाबूराव बेशुध्द होते. त्याप्रसंगी वरील चारही आरोपींनी फिर्यादी आणि तिच्या आईस ‘आम्ही सर्वांनी मिळून मारहाण केली आहे. तुम्हाला कोणाला सांगायचे आहे ते सांगा’ असे म्हणत होते. सरपंच गड्डे यांनी घटनास्थळी येऊन उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी बंडगर यांना दीड वाजता मृत झाल्याचे घोषित झाले. मृत बाबूराव यांचे गेल्या १५ ते २० वर्षापासून अनैतिक संबंध होते. त्यातूनच हा खून झाल्याचे तपास अधिकारी शितोळे यांनी सांगितले, अद्याप आरोपींना अटक झाली नाही. 


चुंगीत अनैतिक संबंधावरून एकाचा खून, चौघांवर गुन्हा मुलगा सांगली येथे खासगी कंपनीत काम करतो. निरोपानंतर बाबूरावची पत्नी मायादेवी मुलगी अहिल्या यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता बाबूराव बेशुध्द होते. त्याप्रसंगी वरील चारही आरोपींनी फिर्यादी आणि तिच्या आईस ‘आम्ही सर्वांनी मिळून मारहाण केली आहे. तुम्हाला कोणाला सांगायचे आहे ते सांगा’ असे म्हणत होते. सरपंच गड्डे यांनी घटनास्थळी येऊन उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी बंडगर यांना दीड वाजता मृत झाल्याचे घोषित झाले. मृत बाबूराव यांचे गेल्या १५ ते २० वर्षापासून अनैतिक संबंध होते. त्यातूनच हा खून झाल्याचे तपास अधिकारी शितोळे यांनी सांगितले, अद्याप आरोपींना अटक झाली नाही. 

बातम्या आणखी आहेत...