आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीन नावावर करण्यासाठी सावत्र मुलांकडून आईचा खून, माढा तालुक्यातील केवड येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खून झालेली महिला. - Divya Marathi
खून झालेली महिला.
 
माढा (सोलापूर )- जमीन माझ्या नावावर कर असे म्हणत सावत्र मुलांनी आईच्या डोक्यावर कोयत्याने वार करुन तिचा खून केल्याची घटना घडली आहे.  माढा तालुक्यातील केवड गावात शुक्रवारी (दि.20) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

राजाबाई  उर्फ हरिशचंद्र पवार (वय 40, रा. केवड) असे खून झालेल्या महिलेचे (आईचे)  नाव आहे. या प्रकरणी समीर हरिश्चंद्र पवार, राजेंद्र हरिश्चंद्र पवार, गणेश  हरिश्चंद्र पवार, लक्ष्मी हरिशचंद्र पवार या  तिघा सावत्र मुलासह व एक सावत्र मुलगी अशा चौघांविरोधात माढा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
राजाबाई पवार यांचे हरिश्चंद्र पवार  यांच्याशी 20 वर्षांपुर्वी लग्न झाले असुन केवड गावात हे कुटूब राहत आहे. राजाबाई यांची केवड येथे 5 एकर व जामंगाव येथे 2 एकर शेती आहे,  ही जमीन आमच्या नावावर वारंवार कर म्हटले तरी का केली नाही या रागाच्या भरात चौघा मुलांनी या आईचा खून केला.
 
हरिश्चंद्र मणसुख पवार याची पहिली पत्नी सुशीला ही मयत झाली असुन तिची राहुल पवार व कृष्णा पवार ही मुले आहेत. तर दुसरी बायको शहाबाई यांची वसंत पवार व फुलाबाई पवार ही दोन मुले आहेत. अशा या  चौघा सावत्र मुलांना जमिनीचा हिस्सा वाटुन घ्यायचा होता. तसेच सावत्र मुलगा राहुल पवार याची बायको ही मयत राजाबाई पवार यांनी पळवुन लावल्याच्या संशयावरुन हा खून केल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे.

20 ऑक्टोबरला रात्री आठच्या सुमारास राजाबाई पवार या आपल्या कुटूबिंयासह घराच्या बाहेर उजेडात बोलत बसल्या होत्या. अचानक राजाबाई पवार यांच्या घरा समोर  येऊन तु आमच्या नावावर जमीन का केली नाही. तु राहुल पवारची बायको का पळवुन लावली असे म्हणत या चोघांनी आईच्या डोक्यावर, मानेवर कोयत्याने वार करुन तिचा खून केला. या चौघांना  अडविण्याचा प्रयत्न केला असता मयत मुलीची आई कमलाबाई काळे व मुलगी लक्ष्मी पवार, हिम्मत शिंदे या तिघांना मारहाण करण्यात आली. लक्ष्मी पवार हिच्या हातावर 
एक वार केला गेला  आहे. तिच्या हाताला टाके घेतले आहेत. ही घटना समजताच पोलिस उपविभागीय अधिकारी बार्शो विजय कबाडे यानी व माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यानी घटनास्थळी भेट दिली आहे. राहुल पवार व कृष्णा पवार या दोघांना माढा पोलिसांनी अटक केली असुन वसंत पवार व फुलाबाई पवार हे दोघे फरार आहेत. माढा पोलिस त्याचा तपास करीत आहेत. माढा ग्रामीण रुग्णालयात मयत राजाबाई पवार यांचे शवविच्छेदन शनिवारी सकाळी 9 वाजता पार पडले.
 
हद्ययद्रावक घटना ...बघ्यांची भुमिका-
राजाबाई पवार यांच्यावर जेव्हा हल्ला सुरु होता. कोयत्याने वार केले जात होते. तेव्हा रस्त्याने येणारे जाणारे लोक व केवड गावचे ग्रामस्थ हे फक्त उघड्या डोळ्याने बघत राहिले. एक ही जण यात पुढे आला नाही. राजाबाई याचे घर माढा वैराग मार्गावर केवड गावात आहे. अखेर राजाबाई या हल्ल्यात ठार झाल्यानंतर बघ्याची भुमिका घेणाऱ्यांनी तेथुन धुम ठोकली. राजाबाई यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह कुटुंबियानी माढा रुग्णालयात आणला आणि पोलिसांना माहिती दिली.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो, माहिती आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...