आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेवताना वाद; डोक्यात वासा घालून मित्राचा खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गोंधळी वस्ती भागातील खुदगब्बर चौकातील एका हॉटेलमध्ये मद्यधुंद तरुणाने मित्राचा डोक्यात लाकडी वाशाने सहा वेळा वार करून खून केला. ही घटना शुक्रवारी १०.३० च्या सुमाराला घडली.

रमजान मौला शेख (वय २८ रा. मड्डी वस्ती) असे मत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नासीर बागवान (रा.शुक्रवार पेठ, सोलापूर) याला अटक करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. रमजान आणि नासीर शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमाराला खुदगब्बर चौकातील एका हॉटेलात एकत्र जेवण करीत होते. दोघांत शाब्दिक वाद झाले. त्याचे पर्यावसन मारामारीत झाले. नासीर बागवानने रमजान शेखच्या डोक्यात लाकडी वाशाने सहा वार केले. अतिरक्तस्राव झाल्याने रमजानचा जागीच मृत्यू झाला. यानंतर नासीर बागवानने घटनास्थळावरून पळ काढला.
रमजानला त्याच्या मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, आई वडील असा परिवार आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार हे करीत आहेत.