आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर: माजी नगरसेवक भुईटेंची हत्या; भोसे फाट्यावर थरार, गाडी अडवून केले मानेवर वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- पंढरपूर येथील काँग्रेसचे माजी स्वीकृत नगरसेवक नामदेव भुईटे (वय ३४) यांची सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. मिरज येथील भोसे फाट्यावर अज्ञात इसमांनी गाडी अडवून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. भुईटे यांच्या मानेवर कोयत्याने वार करण्यात आले. मिरज येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. हा हल्ला कोणी केला याबाबत काहीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मिरज पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जुन्या पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 
भुईटे हे गतवर्षी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक होते. सोमवारी दुपारी वाजता आजारी मित्राला भेटण्यासाठी ते पंढरपूरहून मिरजला गेले. संध्याकाळी पाच वाजता त्यांनी परतीची वाट धरली. हल्लेखोरांनी नेमकी हीच संधी अचूक हेरली. मिरज येथील भोसे फाट्यावर अज्ञातांनी त्यांची गाडी अडवली. त्यावेळी भुईटे यांच्यासह गजानन पवार, राजेंद्र भिंगे, प्रभाकर झाडबुके आणि चालक असे इतर चौघेजण होते. हल्लेखोरांनी भुईटे यांच्या मानेवर कोयत्याने वार केले. त्यानंतर ते फरार झाले. जखमी भुईटे यांना मिरज येथील विशाखा रुगणालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. 
बातम्या आणखी आहेत...