आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांचा खून करून रचला बनाव : चोरट्यांच्या अफवेचा गैरफायदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी- शेतातकाम करण्याच्या कारणावरून मुलाने मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास सळईने मारहाण करून वडिलांचा खून केला. चोरट्यांच्या अफवेचा गैरफायदा घेत त्याने बुधवारी सकाळी चोरट्यांनीच वडिलांचा खून केल्याचा बनाव रचला. पोलिस चौकशीमुळे त्यानेच वडिलांचा खून केल्याचा प्रकार उघड झाला.
पिंपळनेर (ता.माढा) शिवारातील सीना-माढा ढाब्याच्या पाठीमागील वस्तीवर हा प्रकार घडला. जयवंत रामा गोडगे (वय ७०,रा. पिंपळनेर, ता. माढा) असे खून झालेल्याचे तर उत्तरेश्वर जयवंत गोडगे (वय ४२) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी लहान मुलगा बलभीम जयवंत गोडगे यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दिली. मृत जयवंत गोडगे यांनी उदरनिर्वाहाच्या खर्चासाठी प्रांताधिकाऱ्यांकडे दावा दाखल केला होता. यात प्रांताधिकाऱ्यांनी दोन मुले आणि एका मुलीने जयवंत यांना प्रतिवर्षी प्रत्येकी दोन हजार रुपये द्यावेत अथवा एक महिना सांभाळावे, असा आदेश दिला होता. त्यानुसार जयवंत हे २७ जुलै रोजी थोरला मुलगा उत्तरेश्वर गोडगे यांच्याकडे राहण्यासाठी गेले होते.
ऑगस्ट रोजी जयवंत गोडगे यांनी काहीही काम केले नव्हते. त्यामुळे उत्तरेश्वर यांनी आज काय काम केले, अशी विचारणा करत निदान भाकरीपुरते तरी काम करा, असे म्हटल्याने दोघांत वादावादी झाली. तसेच उत्तरेश्वर यांनी शिवीगाळ केली. त्यावरून भांडण झाले. त्या रागात उत्तरेश्वर यांनी सळईने जयवंत यांच्या हात, मांडी, खांदा कोपऱ्यावर मारहाण केली. पोलिस निरीक्षक सुरेश गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. के. मदने, कॉन्स्टेबल पांडुरंग मुंढे यांनी घटनास्थळी भेट दिली.
बातम्या आणखी आहेत...