आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता विवाहितेच्या खुन? मृतदेह घरात पुरल्याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेपत्ता प्रवलिका श्रीमल - Divya Marathi
बेपत्ता प्रवलिका श्रीमल
सोलापूर- लक्ष्मीनरायण टाॅकीज भागात राहणारी एक विवाहित महिला शनिवारी सायंकाळी हरवल्याची तक्रार शांतीनगर पोलिस चौकीत नोंदण्यात अाली. पतीने तक्रार दिली. त्याच्यासह भाऊ इतर नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, ग्रामीण पोलिसांना एक निनावी फोन आला आणि तपासाची दिशा बदलली. 

नवीन विडी घरकुल भागातील एका घरात महिलेचा मृतदेह पुरण्यात अाला अाहे. अन् तीच महिला बेपत्ता असल्याची तक्रार नोंदण्यात आल्याची माहिती पोलिसांना निनावी फोनवर मिळाली. या प्रकरणी पती नरहरी श्रीमलसह तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले अाहे. 

गोदुताई विडी घरकुल येथील ग्रुपमध्ये लागलीच पोलिसांनी संशयित घराची पाहणी केली. तिथे त्यांना संशयास्पद प्रकार पाहायला मिळाला. सध्या तिथे पोलिस बंदोबस्त अाहे. लोकांचीही गर्दी झाली होती. माजी आमदार नरसय्या आडम यांनीही भेट दिली. ग्रामीण वळसंग पोलिसाचे एक पथक आले. त्यांना जमीन उकरून माती टाकल्याचे दिसले. संशय वाटल्यामुळे तहसीलदारांना घटनेची माहिती दिली अाहे. सायंकाळी उशीर झाल्यामुळे मंगळवारी दुपारी जमीन खोदण्यात येईल. त्यानंतर घटनेचा उलगडा होणार अाहे. 

प्रवलिका नरहरी श्रीमल (वय २७ रा. लक्ष्मी नारायण टॉकीजमागे, सोलापूर) ही महिला हरवल्याची तक्रार १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी शांतीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली. या महिलेला सात वर्षांचा दिव्यसाई, चार वर्षांची राजेश्वरी आणि १७ महिन्यांची लकी अशी तीन अपत्ये आहेत. 

खून केल्याची चर्चा 
कुंभारीतीलस्वामी समर्थ विडी घरकुलमध्ये या महिलेस गळा आवळून मारले. यानंतर तिला पाण्याच्या रिकाम्या पिंपात अाणले. पिंप एका ट्रॉलीत ठेवला आणि गोदूताई विडी घरकुल येथील ग्रुपमध्ये आणला. तेथील घराच्या अंगणात कंपाउंड वॉलच्या आतमध्ये खड्डा करून पुरले, अशी चर्चा सोमवारी घटनास्थळी सुरू होती. अनैतिक संबंधातून खून झाल्याचे बोलले जात होते. पोलिसांनी लगलीच तहसीलदारांना बोलावून त्यांच्या समक्ष नियमानुसार खोदाई सुरू केली असती तर सोमवारीच घटनेचे चित्र स्पष्ट झाले असते. पण, तशा हालचाली झाल्या नाहीत. पोलिसांनी उद्यावर ढकलणे पसंत केले. 
 
खुनाचा संशय वाटतोय, पण, मंगळवारी चित्र स्पष्ट होईल.
 बेपत्ता  असलेल्याप्रवलिका श्रीमल या महिलेबाबत माहिती मिळाल्यानंतर मृतदेह पुरल्याबाबत संशय असलेल्या घटनास्थळाची पाहणी झाली. तहसीलदार अाल्याशिवाय पंचनामा करता येत नाही. मंगळवारी दुपारी ही प्रक्रिया होईल. त्या महिलेच्या पतीसह तीन महिलांना ताब्यात घेतले अाहे. काही धागेदोरे हाती मिळाले अाहेत. मृत महिला तीच अाहे का, अाणखी कोण? अथवा संशयित कोण अाहेत? कारण काय अाहे? याचा उलगडा होईल.
- वीरेश प्रभू, पोलिस अधीक्षक 
बातम्या आणखी आहेत...