आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ती ठरत होती अनैतिक संबंधांना अडसर, त्यानंतर प्रेयसीच्या मदतीने डॉक्टर पतीने उचलेले हे पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खून झालेली महिला. - Divya Marathi
खून झालेली महिला.
सोलापूर- अनैतिक संबंधांच्या अडसर ठरल्याने, डॉक्टर पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना वळसंग गावात घडली आहे. एका पोलिस मित्रामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्याची प्रेयसी फरार झाली आहे.
 
आरोपी नरहरी याचे एका विधवा महिलेसोबत अनैतिक संबंध होते,  नरहरीची पत्नी प्रवलिका उर्फ सोनी नरहरी श्रीमलचा ही त्याला अनैतिक संबंधात अडसर होती. त्यामुळे नरहरीने 12 ऑगस्ट रोजी त्याच्या पत्नीला गोड बोलून प्रेयसीच्या घरी नेले. तिथे तिचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह प्रेयसीच्या घरातच पुरुन ठेवला. 
 
यानंतर नरहरीने आपली पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव रचला. सोलापूर शहर पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. मात्र पोलिस तपासात वेगळेच सत्य समोर आले. वळसंग पोलिस ठाण्याचे प्रभारीसह पोलिस निरीक्षक सोनकांबळे यांना वळसंगमधील एका पोलिस मित्राने फोन करुन महिलेचा मृतदेह घरातच पुरल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घराचे खोदकाम करुन महिलेचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी पोलिसांनी नरहर श्रीमलला ताब्यात घेतले आहे. तर नरहरची प्रेयसी विनेदा संदुपटल फरार आहे. विनेदाला 2 मुलेही आहेत.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
 
बातम्या आणखी आहेत...