आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा गळा अावळून खून, पतीला जन्मठेपेची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - चारित्र्याच्या संशयावरून विद्या दीपक जाधव (वय २४) यांचा गळा अावळून खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी बुधवारी सुनावली. दीपक मधुकर जाधव (वय २८, रा. फुलचिंचोळी, ता. पंढरपूर, हल्ली टाकळी सिकंदर, मोहोळ) याला शिक्षा झाली अाहे.

किरण मधुकर जाधव, मधुकर निवृत्ती जाधव, सोमाबाई मधुकर जाधव या तिघांची निर्दोष मुक्तता झाली. प्रधान अादलिंगे (तेलगंवाडी, मोहोळ) यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली होती.

२७ अाॅक्टोबर २०१३ रोजी ही घटना घडली होती. दीपकने सासरा प्रधान अादलिंगे यांना फोन करून विद्या पहाटे घराजवळ चक्कर येऊन पडली अाहे. उपचाराला पंढरपूरला नेत नसल्याचे सांगितले. यानंतर अादलिंगे रुग्णालयात गेल्यानंतर गळा अावळून खून केल्याचे समजले. शवविच्छेदनात गळा अावळून खून झाल्याचा अहवाल अाला. मोहोळ पोलिसात याची तक्रार देण्यात अाली. यामध्ये अकरा साक्षीदार तपासण्यात अाले असून पतीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. यात तिघांना निर्दोष सोडण्यात अाले. सरकारतर्फे अानंद कुर्डूकर, मूळ फिर्यादीतर्फे भारत कट्टे, अारोपीतर्फे धनंजय माने या वकिलांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...