आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवयवदानास ३५० मुस्लिम बांधवांचा प्रतिसाद, युवकाच्या प्रबोधनास यश,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - धर्माच्या अाधारावर अवयवदान संकल्पनेपासून दूर राहणाऱ्या मुस्लिम समाजबांधवांमधील गैरसमज दूर करण्याचे आव्हान समाजातीलच एका युवकाने स्वीकारले असून त्याच्या जनजागृतीला आतापर्यंत ३५० जणांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.

सोशल मीडियाचा विधायक परिणामकारक वापर करत हा युवक राज्यभरातील सुमारे १००० मुस्लिम समाजबांधवांपर्यंत पोहचला असून त्यांच्याकडून अवयवदानाचा संकल्प करवून घेण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. शासनाकडून अवयवदानाविषयी विविध माध्यमातून जागृती सुरू आहे. मात्र, यापासून मुस्लिम समाजबांधव धार्मिक गैरसमजुतींमुळे दूर होते.

परंतु, दुसऱ्यांचे कायमचे अपंगत्व संपविण्यासोबच अनेकांना जीवदान देणारे मरणोपरांत अवयवदान महत्त्वाचे आहे, ही बाब येथील दावाह फाउंडेशनचे अध्यक्ष मुजाहिद शेख या तरुणाच्या लक्षात आली. त्याने यासंदर्भात विविध माध्यमांतून जागृती करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला धर्म मूल्य तत्त्व अवयव जीवनदानाविषयी काय सांगते, याची माहिती शेख यांनी समजावून सांगितली. फेसबुकच्या माध्यमातून त्याने समाजातील युवकांमध्ये यासंदर्भात चर्चा घडवून आणली. या चर्चेमध्ये त्याला सुमारे ३५० जणांचे मतपरिवर्तन घडविण्यात त्याला यश आले असून बहुतेकांनी अवयवदान करण्याचा संकल्प करण्याचा मनोदय व्यक्त केला. पवित्र कुरआनमध्ये सांगितले आहे की, (५:३२) एखाद्याची हत्या केल्यास समस्त मानवजातीची हत्या केल्यासारखी असून जीवदान दिल्यास समस्त मानवजातीला जीवदान देणे होय. याच तत्वाला अनुसरून शेख प्रबोधन करत आहेत. त्यांच्या अभियानामध्ये औरंगाबादचे सय्यद पटेल, अहमदनगरच्या युवती अफरिन शेख, नांदेडचे गफार शेख, पुणे येथील मोईन सय्यद तसेच लातूरचे बलदेव माचवे, सोलापूरचे अजय शहा यांनीही सक्रिय सहभाग घेतला आहे. यामुळे आता राज्यात सर्वत्र अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.

एकहजाराचा निर्धार : राज्यभरातून सुमारे १००० मुस्लिम नागरिकांकडून अवयवदानाचा संकल्प करवून घेण्याचा निर्धार शेख त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. आतापर्यंत त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून जागृती थेट प्रबोधनाद्वारे त्यांनी जीवनदान सर्वात मोठे दान असल्याचे पटवून दिले आहे. उप्रकमासाठी त्यांनी विविध सामाजिक धार्मिक संस्थांची मदत घेण्याची तयारी चालविली आहे.
याबाबत होता गैरसमज
मुळात मरणोपरांत आपले कोणतेही अवयव दान करू नयेत, असा मुस्लिम समाजामध्ये समज होता. मात्र, शेख यांनी इस्माल धर्मग्रंथातील तत्वांच्या आधारावर हे मत खोडून काढले. इस्लाम दुसऱ्यांना जीवनदान देण्यासाठी प्रोत्साहित करतो, ही जाणीव करून दिल्याने अनेक गैरसमज दूर झाले. अन्य लोकांचेही प्रबोधन मुजाहिद शेख यांनी केले.

- राज्यभरातून याउपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे इस्लाम धर्मिय नसलेले युवकही मदत करत आहेत. आतापर्यंतच्या चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच एक हजार समाजबांधवांकडून अवयवदानाचा संकल्प करण्याचा निर्धार केला आहे.
-मुजाहिदशेख, दावाह फाउंडेशन.
बातम्या आणखी आहेत...