आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिरागांनी उजळला सुफी संत शाहजहूर दर्गा परिसर, उरुसानिमित्त बुधवारी रात्री झाला चिरागा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरातील प्रसिद्ध दर्गाह हजरत सय्यद शाहजहूरवली कादरी यांच्या उरुसानिमित्त बुधवारी पारंपरिक पद्धतीने चिरागा (दीपोत्सव) कार्यक्रम उत्साहात पार पडला. संपूर्ण दर्गाह परिसरात चारही बाजूंनी दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. यामुळे दर्गाह परिसर उजळून निघाला होता. 
 
उरुसामध्ये बेसन रोटी, संदल मिरवणूक काढण्यात आली. मंगळवारी चिरागा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पुरुषांबरोबर महिलांची गर्दी मोठी होती. दर्गाहच्या प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण परिसर दीपोत्सवांनी झळाळून निघाला होता. दर्गाहला येताना अनेकजण तेल आणून तेथे ठेवलेल्या पणत्यांमध्ये ओतत होते. सूर्य मावळल्यापासून येथे दीपोत्सव साजरा केला जात होता. पणत्या विझू नये म्हणून अनेक महिला आणि लहान मुले त्या पणत्यांमध्ये तेल आेतून त्याची रक्षा करत होते. चिरागानंतर मौलानांचे बयान (प्रवचन) झाले. मौलवींनी इस्लामचा शांततेचा आणि मानवतेचा संदेश दिल्याचे सांगितले. या वेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवक, भक्त आणि नागरिकांनी परिश्रम घेतले. दर्गाह परिसरात सामाजिक संघटनांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्याचा लाभ अनेकांनी घेतला. 
बातम्या आणखी आहेत...