आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षणासाठी गुरुवारी मुस्लिमांचा एल्गार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- नोकरी आणि शिक्षणामध्ये अारक्षण द्यावे, शरियत कायद्यामध्ये शासनाने हस्तक्षेप करू नये, या प्रमुख मागण्यांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने ५ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची जय्यत तयारी झाली असून, सुमारे दीड लाख समाजबांधव उपस्थित राहतील, असा अंदाज आयोजकांनी सोमवारी(दि.२) झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला विविध राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

पत्रकार परिषदेत बोलताना नेत्यांनी सांगितले, देशाच्या स्वातंत्र्यापासून मुस्लिम समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थिती जाणून घेण्यासाठी शासनाने रंगनाथ मिश्रा, न्या.सच्चर आयोग, डॉ.महेमुद रहेमान, यांसारख्या समित्यांची नेमणूक केली होती. या समित्यांनी मुस्लिम समाजाचे मागासलेपण अहवालातून दाखवून दिले आहे. मात्र, त्यानंतरही शासनाकडून समाजाच्या विकासासाठी विशेष पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे समाज स्वत:च्या अस्तित्वासाठी, सुरक्षिततेसाठी आणि समानतेच्या मुद्द्यावर सतत झुंजत आहे. तरुणंाना काम नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...