आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: एन. रघुरामन यांचे २४ जानेवारी रोजी व्याख्यान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळख असणाऱ्या एन. रघुरामन यांचे रविवारी सोलापुरात व्याख्यान होत आहे. दैनिक ‘दिव्य मराठी’ने जाणून घ्या मॅनेजमेंट फंडे या विषयावर त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले असून २४ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता फडकुले सभागृहात हा कार्यक्रम होत आहे.

व्याख्यान सर्वांसाठी खुले मोफत असून केवळ काही जागा आरक्षित असणार आहेत. हा कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. सर्वांनी वेळेवर आसनस्थ व्हावे. एन. रघुरामन हे भारतातील नावाजलेल्या आणि एन. रघुरामन टोपच्या मार्गदर्शकांमध्ये अग्रगण्य आहेत.

एन. रघुरामन हे गेल्या अनेक वर्षांपासून मॅनेजमेंट फंडा हे लोकप्रिय सदर चालवत आहेत. या लेखांमधून ते लोकांना सोप्या भाषेत व्यवस्थापनातील बारकावे समजावून सांगत असतात. प्रत्यक्ष त्यांना ऐकण्याची संधी ‘दिव्य मराठी’ने या निमित्ताने उपलब्ध करून दिली आहे. ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी आयोजित या कार्यक्रमात मॅनेजमेंट फंडे सांगण्यात येतील. तसेच २०२० मधील संधी आणि त्यासाठी युवकांनी कशाप्रकारे तयारी करावी यावर ते युवक, नोकरवर्ग, शिक्षक, व्यावसायिक, महिला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. याचा जास्तीत जास्त सोलापूरकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ‘दिव्य मराठी’च्या नितीन बुऱ्हाणपुरे (९७६५५६२८७२) यांच्याशी संपर्क साधावा.
एन. रघुरामन यांचा परिचय
>३० वर्षांपासूनचा पत्रकारितेतील अनुभव
>मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण
>मॅनेजमेंट फंडा या विषयावर दैनिक भास्करच्या देशभरातील आणि 'दिव्य मराठी'च्या राज्यस्तरीय आवृत्त्यांमधून लेखन.
>फ्रि प्रेस, डेली, इंडियन एक्स्प्रेस आदी दैनिकांमधून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
>दैनिक भास्करमध्ये विविध पदांवर जबाबदारी, डीएनए दैनिकात वरिष्ठ संपादक (नियोजन) या पदावरही काम.
>सोप्या भाषेतून मॅनेजमेंट फंडा सांगण्याचा हातखंडा अन् अभ्यासपूर्ण शैली.