आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावना दुखावल्या: मुख्यमंत्र्यांचा नाभिक समाजाने केला निषेध; मोर्चा, दुकाने बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नाभिक समाजातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झालेल्या अपमानास्पद भाष्य केल्याने मोर्चा काढून याचा निषेध करण्यात आला. शनिवारी एक दिवस दुकाने बंद ठेवण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 


जाहीर माफी मागणार नाही, तोपर्यंत नाभिक समाज निषेध अधिकाधिक तीव्र पद्धतीने करण्याचा इशारा यानिमित्त देण्यात आला. याचे परिणाम मतदानाच्या माध्यमातून दाखवून देण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी नाभिक समाजातील विविध पदाधिकारी अॅड. विकास तिऱ्हेकर, प्रकाश शिंदे, प्रभाकर कालेकर, भारत शिंदे, वैभव शेटे, पांडुरंग चौधरी, संतोष धोत्रे, सुलोचना भाकरे, संतोष राऊत, माधवी पारपल्लीकर, संतोष राऊत, मनोज डिगे, संजय चिखले, आनंद राऊत, विजय माने आदी उपस्थित होते. 


मुख्यमंत्र्यांची बौद्धिक दिवाळखोरीच
मुख्यमंत्रीफडणवीस यांनी अपमानित करण्यासाठी नाभिकाचा उल्लेख करीत असतील तर ही अवहेलना नाभिक समाज कदापि सहन करणार नाही. ही मुख्यमंत्र्यांची बौद्धिक दिवाळखोरीच आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्र निषेध करीत आहे. अशा भावना नाभिक समाजातील नेते, संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. 


समाज असंघटित असल्याने दुर्लक्ष 
समाजहा असंघटित, कामगार क्षेत्राशी निगडित असल्याने आजपर्यंत सर्वच सत्ताधारी पक्षांनी दुर्लक्षच केले. कारण नसताना हुशार राजकारणी हे लोकांसमोर टिंगलटवाळीचे माध्यम म्हणून कायमच उल्लेख करतात. पण आज थोड्या-फार शिक्षणाने हा समाज सुशिक्षित झाला असला तरी आपल्या शासकीय धोरणांमुळे आजही समाज उपेक्षित आहे. मुळातच अपमानास्पद सामाजिक उपेक्षित जगणे वाट्याला आले असताना केवळ सोशिक असल्याने समाज अजूनही शांत आहे, अशा भावना ही व्यक्त करून निषेध व्यक्त करण्यात आला. 

 

 

नाभिक दुकानदार, कारागीर यांना टपरी योजना, नाभिक दुकानदारांना अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण, पेन्शन योजना, मुलांना शिक्षणासाठी सवलती अशा अनेक मागण्या नाभिक समाजाच्या आहेत. सतत १७ वर्षांपासून यासाठी पाठपुरावा होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत उलट अपमान होतो आहे, अशा भावनाही व्यक्त झाल्या. 


आहे भाष्य, वाद का? 
मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामात भाषण केले. यात मागील सरकारची कार्यपद्धती सांगण्यासाठी नाभिक समाजातील व्यावसायिक हे जसे गिऱ्हाईक टिकवण्यासाठी प्रत्येकाचे अर्धी दाढी, अर्धी मिशी कट, असे अर्धे अर्धेे काम करतात. तसे मागील सरकारने कार्य केले अाहे, असे उदाहरण भाषणात दिले होते. 

बातम्या आणखी आहेत...