आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagarotthan 146 Million Will Be In Coming Months

‘नगरोत्थान’चे १४६ कोटी येत्या महिन्यात मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत ड्रेनज आणि रस्त्याच्या कामासाठी दुसऱ्या टप्प्यातील १४६ कोटी रुपये राज्य सरकार पुढील महिन्यात देणार आहे. तसेच महापालिकेच्या वाट्याची ३० टक्के रक्कम कर्जरूपाने देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी दिली. थांबलेली कामे मार्गी लागतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरात ५३४ कोटीची कामे सुरू आहेत. यात राज्य सरकार ७० टक्के तर महापालिका ३० टक्के असा वाटा आहे. पहिल्या टप्याचे ८७ कोटी रुपये राज्य सरकारने दिले. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान दिलेले नाही. त्यामुळे कामे थांबलेली आहेत.

कामे थांबलेली असल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ राज्य सरकारच्या नगरविकास खात्याच्या सचिवा मनीषा म्हैसकर यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी महापौर प्रा. सुशिला आबुटे, नगरसेवक दिलीप कोल्हे, बाबा मिस्त्री, आयुक्त विजयकुमार काळम-पाटील आदी उपस्थित होते. नगरोत्थान योजनेतील पहिल्या टप्प्यातील झालेली कामावर चर्चा झाली. थांबलेल्या कामाविषयी माहिती देण्यात आली. दुसऱ्या टप्याचे अनुदान शासकीय कर्ज पुढील महिन्यात उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे या दोन्ही योजनेच्या कामाला गती मिळेल, असे हेमगड्डी यांनी सांगितले.

महापालिकेची आर्थिक स्थिती अवघड असल्याने दुसऱ्या टप्प्यातील ३० टक्के रक्कम उभी करणे महापालिकेस शक्य नाही. त्यामुळे राज्य सरकारने ही रक्कम कर्जाऊ द्यावी, असा पर्याय चर्चेत पुढे आला. त्याप्रमाणे रक्कम कर्जाऊ देण्यासाठी प्रयत्न करणार, असे म्हैसकर म्हणाल्या.
शहर विकासाची योजना अशी
शहरात११० किमी रस्ते आणि १३५ किमी ड्रेनज लाइन आणि तीन मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येत आहे. यासाठी ५३४ कोटी मंजूर आहेत. अनुदान मिळाले नसल्याने काम थांबले आहे.

शासनाकडे मागणी
स्थानिकसंस्था कर (एलबीटी) पोटी २८ कोटी रुपये अनुदान द्यावे
नगरोत्थान योजनेचे १४६ कोटी
शासकीय अनुदान कोटी आदी अनुदान द्यावे