आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक नागेश ताकमोगे अन् अनंत जाधव यांचा शोध सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नगरसेवक नागेश ताकमोगे यांच्यावर मुंबई झोपडपट्टी दादा कलमान्वये एमपीएडीए कारवाईची तयारी पोलिसांनी केली अाहे. पण, ताकमोगे हे शहरात नसल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात येत अाहे. मागील गुरुवारी विजापूर नाका पोलिसांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यांना येत्या अाठ तारखेपर्यंत पोलिसात हजर राहण्यासाठी सूचना दिल्या अाहेत. पोलिसांना वारंवार शिवीगाळ करणे, अरेरावी करणे असे गुन्हे दाखल अाहेत.
काही महिन्यांपूर्वी अासरा चौकात त्यांच्या कारला नंबरप्लेट नसल्यामुळे वाहतूक पोलिसांनी दंड केला होता. तेव्हा अरेरावी केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिस अायुक्तालयातर्फे ताकमोगे यांच्यावर एमपीएडीए कारवाईसाठी प्रस्ताव तयार केला अाहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस घरी गेल्यानंतर ते सापडले नाहीत. दरम्यान, त्यांच्या घरी, महापालिकेत, संपर्क कार्यालयात जाहीरनाम्याची माहिती देण्यात अाली अाहे. त्यांचा शोधही सुरूच अाहे. येत्या अाठ आॅक्टोबरपर्यंत त्यांना हजर राहण्याचे अादेश अाहेत. नाहीतर पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी दिली.

जाधवपॅरोलवर बाहेर, जेलमध्ये परतलेच नाहीत
माजी नगरसेवक अनंत जाधव यांना एका गुन्ह्यात तीन वर्षांपूर्वी शिक्षा लागली होती. पॅरोलवर अाल्यानंतर ते परत कारागृहात गेलेच नाहीत. कारागृह विभागाने त्यांच्यावर फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिल्यामुळे गुन्हाही दाखल झाला अाहे. दोन महिन्यापूर्वी शहरात त्यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यांचे डिजिटल फलकही लागले. शिक्षेतील अारोपी असताना वाढदिवस साजरा झाला होता. पोलिसांनी त्यांचा शोध का घेतला नाही, असा प्रश्न समोर अाला होता.
त्यावेळी गुन्हे शाखेच्या फरार पाहिजे अारोपी पथकाने शोध घेण्याचा प्रयत्न केला.
फौजदार चावडीचे दुय्यम निरीक्षक श्री. सय्यद यांना तपास करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यांच्याकडून शोध सुरू असून जाधव हे अजून सापडले नाहीत. याबाबत श्री. सय्यद यांना विचारले असता, अामच्याकडून शोध सुरू अाहे. नागरिकांनाही काही माहिती असल्यास अाम्हाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

फरार घोषित करण्याची कारवाई होईल
अाठ अाॅक्टोबरपर्यंत ताकमोगे हे पोलिसात हजर नाही झाल्यास त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया म्हणून फरार घोषित करण्यात येईल. अामच्या विभागात पाहिजे फरार अारोपींची यादी अाहे, त्या पथकाकडून शोध सुरू होईल, असे पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले म्हणाल्या. तसेच फरार घोषित केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या मालमत्त्तेवर टाच अाणू शकतात. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया असल्याचे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...