आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैराट फेम नागराज मंजुळेंनी केला आपले रेशन कार्ड रद्द करण्यासाठी अर्ज, सांगितले हे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक नागराज मंजुळे. - Divya Marathi
दिग्दर्शक नागराज मंजुळे.
सोलापूर- 'सैराट' फेम सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी करमाळ्यात येऊन त्यांचे रेशन कार्ड रद्द केले आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अन्न सुरक्षा आवश्यकतेची गरज नसलेल्या नागरिकांनी या योजनेतून बाहेर पडावे, या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हा निर्णय घेतला. करमाळ्यातील तहसीलदार कार्यालयात येऊत संबंधित योजनेतून बाहेर पडण्याचा अर्ज मंजुळे यांनी दिला.
 
माझ्याकडे असणारी पिवळी शिधापत्रिका मी वापरत नाही. गरजूंना हे अन्न मिळावे म्हणून मी या योजनेतून बाहेर पडत असल्याचे नागराज मंजूळे यांनी सांगितले. यावेळी करमाळ्याचे तहसीलदार संजय पवार यांच्याकडे अर्ज भरुन देण्यात आला. अन्न सुरक्षा आवश्यकतेची गरज नसलेल्या नागरिकांनी या योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...