आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या देशात एवढे घोटाळे झालेच कसे : आडम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भ्रष्टाचारमी स्वत: करणार नाही आणि करू देणार नाही, अशी गर्जना करून पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींच्या देशात नुसतेच घोटाळे सुरू आहेत. अब्जावधी रुपयांचा घोटाळा करून परदेशात लपणारा ललित मोदी, त्याला ‘पद्मश्री’ किताब देण्याची शिफारस करणाऱ्या वसुंधराराजे सिंधीया, धनिकांना बनावट पासपोर्ट देणाऱ्या सुषमा स्वराज, अनेकांचे बळी घेणारा व्यापमं घोटाळा, चिक्की घोटाळा. एवढे घोटाळे झाले कसे? असा प्रश्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य नरसय्या आडम यांनी केला.

भ्रष्टाचार आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी माकपने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. भ्रष्टाचाराच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन केले. त्यानंतर आडम यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारांवर टीकेची झोड उठवली.
जनविरोधी धोरणे स्वीकारून सामान्यांना महागाईच्या खाईत लोटले जात आहे. रेशनव्यवस्था मोडीत काढली जात आहे. त्यामुळे हे सरकार कुणासाठी आहे, याचा प्रश्न पडतो, असेही श्री. आडम या वेळी म्हणाले.

पक्षाचे जिल्हा सचिव एम. एच. शेख, सिद्धप्पा कलशेट्टी यांचीही भाषणे झाली. या वेळी नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, कुरमय्या म्हेत्रे, नलिनी कलबुर्गी, शेवंता देशमुख, सलीम मुल्ला, महिबूब हिरापुरे, सलीम पटेल, फातिमा बेग, लिंगव्वा सोलापुरे उपस्थित होते.

आडम यांनी केले आरोप
केंद्रीयमनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पदव्या बोगस असल्याचे आडम म्हणाले. २४ परिपत्रके काढून पंकजा मुंडे यांनी २०६ कोटींचा घोळ केला. सर्वात मोठ्या व्यापमं घोटाळ्यात तब्बल ४७ जणांचा मृत्यू झाला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्याकडे बेहिशेबी संपत्ती आहे. हे सारे कशाचे निदर्शक आहे, असा सवाल आडम यांनी या वेळी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्या वेळी बोलताना नरसय्या आडम. शेजारी अॅड. एम. एच. शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी.
बातम्या आणखी आहेत...