आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचा बिगूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शारदाबाई पवार क्रीडानगरी - माजीकेंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आजपासून येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर पुरुष महिला गटाची ४९ वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा सुरू होत आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच होत असलेली ही स्पर्धा सोलापूर अॅम्युचर खो-खो असोसिएशनने आयोजित केली आहे.
निवासव्यवस्था ‘अ’ दर्जाची
स्पर्धेतील सर्व खेळाडूंची ‘अ’ दर्जाची निवास व्यवस्था केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली आहे. तेथून खेळाडूंसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पहिल्या शेवटच्या दिवशी रेल्वे स्टेशन ते निवास परत अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. पंचांची सोय स्पोर्ट््स हॉस्टेलमध्ये तर पदाधिकाऱ्यांची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.

स्पर्धेचे आकर्षण मॅट
मॅट हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण. राष्ट्रीय स्पर्धेत २०१२ पासून मॅटवर खो-खोची सुरवात झाली. असे असले तरी सोलापूरकरांना हे नवीन आहे. दोन मातीची दोन मॅटची तर एक क्रीडांगण सरावासाठी तयार करण्यात आले आहे.

विजयासाठी चुरस : स्पर्धेची गटवार विभागणी
पुरुष : : रेल्वे,ओडिशा, तामिळनाडू, आसाम, सिक्कीम.
: महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, अंदमान निकोबार, आयर्लंड, त्रिपुरा.
: कोल्हापूर, गुजरात, बिहार, नागालँड.
: कर्नाटक, छत्तीसगड, मध्य भारत, जम्मू काश्मीर.
: केरळ, हरियाणा, गोवा, उत्तराखंड.

एफ : पश्चिम बंगाल, तेलंगणा, पंजाब, हिमाचल प्रदेश.
जी : झारखंड, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश.
एच : पाँडेचरी, विदर्भ, मणिपूर, राजस्थान.
महिला: :महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा.
: केरळ, तामिळनाडू, पंजाब, नागालँड.
: कर्नाटक, छत्तीसगड, गोवा, गुजरात.
: पश्चिम बंगाल, मध्य भारत, झारखंड, आसाम.
: विदर्भ, तेलंगणा, बिहार, अंदमान निकोबार.
एफ : पाँडेचरी, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान.
जी : ओरिसा, चंदिगड, उत्तराखंड, जम्मू काश्मीर.

दर्जेदार जेवणाची सोय
महापौर चषक क्रीडा स्पर्धा खंडित झाली. परंतु, या स्पर्धेमुळे दर्जेदार भोजन व्यवस्था अशी सोलापूरची ओळख निर्माण झाली. त्यामुळे खेळाडूंना सकाळी नाश्त्यासाठी केळी अंडीसह रोज रात्रीच्या जेवणात गोड पदार्थ ठेवण्यात आले आहेत. तसेच दोन दिवस रात्रीच्या जेवणात मांसाहारी जेवण आहे.

उद्घाटन सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी
स्पर्धेचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी पार्कवर होईल. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते संघटक शरणप्पा तोरवी यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार करण्यात येणार आहे. खासदार विजयसिंह मोहिते, आमदार गणपतराव देशमुख, दीपक साळुंखे, दिलीप सोपल, बबनराव शिंदे, सिद्धाराम म्हेत्रे, प्रणिती शिंदे, दिलीप माने उपस्थित राहतील. उद््घाटन सोहळ्याप्रसंगी एक तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.