आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघ यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा परिषदेचे शिक्षक बाळासाहेब वाघ यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे प्रत्येक वर्षी प्रयोगशील उपक्रमशील, राष्ट्रीय सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या शिक्षकांना देण्यात येतो. या पुरस्काराचे वितरण सप्टेंबर रोजी विज्ञान भवन, दिल्ली येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दिला जाणार आहे. रोख ५० हजार रुपये, सिल्व्हर मेडल, स्मृतिचिन्ह गुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असेल.

श्री. वाघ २३ वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक विभागात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.ते सर फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण उपयोगी उपक्रम करण्याचे काम करतात. तसेच सध्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रयोगशील उपक्रमशील शिक्षकांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम केले जात आहे. तसेच राष्ट्रीय अांतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये देखील सहभाग घेतला आहे. शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी यासाठी श्री. वाघ हे शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. त्यांना जिल्हा राज्यस्तरावरील विविध पुरस्कार मिळाले आहेत. सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रूप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
अनेक वर्षाच्या कष्टाचे फळ मिळाले
राष्ट्रीयस्तरावरील उच्च पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला आहे. अनेक वर्षापासून काम केलेल्या कष्टाचे फळ प्राप्त झाले. पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. पुढील काळामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा भरविण्याचा प्रयत्न करणार आहे. सर फाउंडेशनचे काम शाळेच्या वेळेत करता सुटीच्या वेळी केले जाते. बाळासाहेब वाघ , शिक्षक
बातम्या आणखी आहेत...