आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एनटीपीसी’ला साफ सांडपाणी देण्यासाठी ३४१ कोटींची गरज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या (एनटीपीसी) फताटेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील वीज प्रकल्पास महापालिका प्रक्रिया करून सांडपाणी देणार आहे. त्यासाठी ३४१ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा भार महापालिकेस उचलावा लागणार आहे.
सुमारे साडेतीनशे कोटी रुपये उभे करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. सध्या ही योजना लोकसहभागातून उभी करण्याचा विचार आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी ‘एनटीपीसी’पर्यंत नेण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. हे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
उजनी जलाशयातून ‘एनटीपीसी’च्या जलवाहिनीतून पाणी शहराला पिण्यासाठी घ्यायचे आणि बदल्यात शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून द्यायचे असा निर्णय सरकार पातळीवर झाला आहे. महापालिका सध्या बांधत असलेल्या तीन मलनिस्सारण केंद्रांत सांडपाणी साफ केले जाईल. त्यानंतर त्याचा पुरवठा ‘एनटीपीसी’ला करण्यात येणार आहे. हे झाल्यास शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल. यामुळे भीमा आणि सीना नदीचे प्रदूषण थांबेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

महापालिका सध्या तीन ठिकाणी मलनिस्सारण केंद्र बांधत आहे. त्यास सुमारे ८७ कोटी रुपये खर्च येणार आहे. जलवाहिनी आदीतून सांडपाणी सफाईच्या या प्रकल्पास एकूण २१२ कोटी रुपये खर्च येणार आहे. तीन प्रकल्पांसह मलनलिका टाकणे आदी कामे निधीची कमतरता झाल्यास मार्च २०१६ अखेर काम पूर्ण होईल. देगाव केंद्राचे काम ६० टक्के झाले असून त्याची क्षमता ७५ एमएलडी (दशलक्ष लिटर रोज) आहे. प्रतापनगर केंद्राचे काम ५० टक्के झाले असून त्याची क्षमता १५एमएलडी तर कुमठे केंद्राचे ८० टक्के झाले आहे. त्याची क्षमता १२.५ एमएलडी आहे. एकूण १०२.५ एमएलडी पाणी यातून उपलब्ध होईल. हे पाणी घेऊन ते ‘एनटीपीसी’ला देण्यात येणार आहे. ‘एनटीपीसी’च्या परिसरात आणखी एक जलशुद्धीकरण केंद्र बांधावे लागणार आहे. त्यासाठी जलवाहिनी टाकणे आदींचा एकूण खर्च ३४१ कोटी रुपये आहे.
होलाणी करणार आराखडा
‘एनटीपीसी’ला पाणी देण्याचा आराखडा जलवितरण तज्ज्ञ राजेंद्र होलाणी करणार अाहेत. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचे तपशील यायचे आहेत. ते आल्यानंतर त्यांना काम देण्यात येणार आहे.

असा येईल अंदाजे खर्च (कोटींत)
देगावते सोरेगाव क्राॅस सोरेगाव क्राॅस ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत मुख्य पाइपलाइन (रायझिंग मेन) टाकणे : ४६
कुमठे प्रताप नगर मलशुध्दीकरण केंद्रांची पाइपलाइन जोडणे : १०
देगाव, प्रताप नगर, कुमठे येथे मलनिस्सारण केंद्रांवर पंप पंपगृह बांधणे :
एनटीपीसीत एकूण १०० एमएलडी पाण्यावर ‘आरओ’ प्रक्रिया प्रकल्प : २१०

मलवितरिका सफाई दुरुस्ती करणे :
अक्कलकोट रोड ते शेळगी नाल्याच्या बाजूने देगावपर्यंत १८ किमी पाइपलाइन : ६५

अशा आहेत उपाययोजना
तीन केंद्रांतून सांडपाणी एकत्र करून एनटीपीसी जागेत नेऊन आणखी साफ करणे
शहरातीलसर्व चेंबरची गळती दूर करणे दुरुस्ती करणे
शेळगीनाल्यातून शेतकरी पाणी घेत असतात. ते बंद करणे. त्यामुळे पाण्याच्या प्रमाणात वाढ होईल.
शेळगीनाल्यातून पाणी देगाव येथील मलनिस्सारण केंद्रात आणल्यास पाण्याची आवक वाढेल
मलनिस्सारणकेंद्र, शेळगी नाला येथील ड्रेनेज लाइन व्यवस्था सुधारण्यासाठी पूर्णपणे वेगळी विभागणी करून स्वतंत्र यंत्रणा ठेवणे

आराखडा तयार करू
^महापालिका मलनिस्सारण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जाते, पण टीडीएस कमी केले जात नाही. ते एनटीपीसी येथे आरओ प्रकल्प उभारून करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी राजेंद्र होलाणी यांना आराखडा तयार करण्यास सांगण्यात येणार आहे.” यू. बी. माशाळे, उपअभियंतामनपा ड्रेनेज विभाग