आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाजूक जिल्हा बँकेला राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज देण्याची शिफारस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा मध्यवर्ती बँकेला चालू वर्षात पीक कर्जाचे ९०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र बँकेची आर्थिक स्थिती खूपच नाजूक असल्याने उद्दिष्ट पूर्ण होणे अशक्य आहे. यामुळे शासनाकडून मदतीऐवजी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेकडून जिल्हा बँकेलाच थेट रक्कम मिळावी आणि ही रक्कम जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना पीककर्जाच्या रूपाने वाटप करावी, अशी शिफारस राज्य शासनास सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिली. यास मंजुरी मिळाल्यास शेतकऱ्यांना चालू वर्षात तातडीने पीक कर्ज उपलब्ध होईल आणि गरजही पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक कर्जाचे वाटप थकीत कर्जाचे पुनर्गठनासंबंधी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी जिल्ह्यातील पीककर्ज पुर्नगठन यासंबंधी माहिती सादर केली. जिल्हा बँकेला २०१५-१६ मध्ये ७००कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. मात्र, हे पूर्ण झाले नाही. याचा परिणाम शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यावर झाला होता. यंदा जिल्हा बँकेला ९०० कोटी उद्दिष्ट दिले आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता हे उद्दिष्ट पूर्ण होणे अशक्य आहे. जिल्हा बँकेचे खातेदार असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे, यासाठीच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेकडून िजल्हा बँकेला रक्कम उपलब्ध करून देण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. शासनाकडून जिल्हा बँकेला मदत मिळणे, त्याचे वाटप होणे यामध्ये खूप मोठा कालावधी जाईल. यामुळे हा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

विम्याची रकम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
जिल्हा बँकेने थकीत कर्जामुळे शेतकऱ्यांना मंजूर असलेल्या पीक विमा रकमेतून वसुली सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा बँकेला सक्त सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बँकेकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे. याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

पुनर्गठनासाठी ३५० कोटींची मागणी...
५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यातील हजार ३८ गावांतील शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्गठन करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जिल्ह्यात जुलैपासून सुरू होणार आहे. यासाठी जिल्हा बँकेने पुनर्गठनापोटी शासनाकडून ३५० कोटींची मागणी केली आहे. मागील वर्षात जिल्हा बँकेने लाख ४३ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले होते. चालू वर्षी एप्रिल मे महिन्यात ४८ हजार शेतकऱ्यांना ४३७ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...