आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी, काँग्रेस, आघाड्यांचे वर्चस्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापुरातील ग्रामपंचायतींच्या निकालानंतर माजी आमदार दिलीप माने यांच्या सिद्धेश्वर पेठेतील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
सोलापूर - जिल्ह्यातील४८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी दुपारपर्यंत जाहीर झाला. बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे किंवा त्यांच्या स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व राहिले आहे. काही ठिकाणी उलथापालथ झाली. त्यामुळे स्थानिक आमदारांना नव्याने राजकारणाची मांडणी करावी लागणार आहे.

माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहिला आहे. अकलूज ग्रामपंचायतीवर मोहितेंचे वर्चस्व राहिले आहे. बार्शी तालुक्यात ३० ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या. राष्ट्रवादीने २१ आणि भाजपने तीन ग्रामपंचायती जिंकल्या. इतर ठिकाणी सर्वपक्षीय स्थानिक आघाड्या, अपक्षांचे वर्चस्व अबाधित राहिले. मंगळवेढा तालुक्यात आठ ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींवर आमदार भालके गट, दोन ग्रामपंचायतींवर आवताडे-परिचारक गट आणि हुलजंती येथे सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांच्या गटाने विजय मिळवला आहे.

माढा तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर आमदार बबनराव शिंदे विठ्ठल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटाने वर्चस्व राखले. मात्र काही प्रमुख ग्रामपंचायतींवर खासदार विजयसिंह मोहिते गटाने विजय मिळवला आहे. करमाळा तालुक्यातील २९ पैकी निम्म्या ग्रामपंचायतींवर माजी आमदार श्यामल बागल गटाने तर आमदार नारायण पाटील यांनी १३ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.

पंढरपूर तालुक्यातील ५७१ जागांपैकी २६६ जागा जिंकल्याचा दावा परिचारक गटाने केला आहे. आमदार भालके आणि काळे गटाने परिचारक यांच्या ताब्यात असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. अक्कलकोटमध्ये आमदार सिद्धाराम म्हेत्रे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी तालुका आपल्याच ताब्यात असल्याचा दावा केला आहे. उत्तर सोलापुरातील १८ पैकी नऊ ग्रामपंचायतींवर आमदार दिलीप माने गटाने विजय मिळवला. येथे दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचा गट राहिला. मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने ६६ पैकी ४३ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला. भीमा परिवाराने १० ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या. दक्षिण सोलापूर तालुक्यात स्थानिक नेत्यांचीच ताकद दिसली. सांगोला तालुक्यात बहुतांश जागी शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली. त्याखालोखाल राष्ट्रवादी शिवसेनेने यश मिळवले.
बातम्या आणखी आहेत...