आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Descend Against BJP's Mirgane

भाजपच्या मिरगणेंविरोधात राष्ट्रवादीे उतरली रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - भाजपचे राजेंद्र मिरगणे यांना योग्य वेळी उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते सुधीर सोपल यांना दिला. मुख्यमंत्र्यांच्या बार्शी दौऱ्याप्रसंगी भगवंत मैदानावर झालेल्या जाहीर सभेत मिरगणे यांनी सोपल यांच्यावर थेट आरोप करत टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादी आक्रमक झाली होती. मिरगणे यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ त्यांच्या तेलगिरणी चौकातील कार्यालयासमोर सोमवारी राष्ट्रवादीच्या वतीने धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते.

आंदोलनासाठी राष्ट्रवादीचा मोर्चा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून स्टॅण्ड चौक येथून तेलगिरणी चौकाकडे जाताना पोलिस ठाण्यासमोर अडवला. त्यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासमोर ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. नंदकुमार काशीद म्हणाले, तालुक्याच्या राजकारणात आमदार दिलीप सोपल यांनी नेहमीच नीती तत्त्वाचे राजकारण केले. त्यामुळेच ३५ वर्षांपासून जनता त्यांच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेत भाजपचे राजेंद्र मिरगणे यांनी आमदार सोपल यांच्याबाबत वापरलेली भाषा ही अनैतिक बेताल, आक्षेपार्ह होती. अशी वक्तव्ये राष्ट्रवादी येथील सोपलप्रेमी जनता कदापि सहन करणार नाही. यापुढील काळात त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा यांनी दिला. नगराध्यक्ष गणेश जाधव यांनी आक्रमक भाषण केले.
या वेळी अॅड. विकास जाधव, मनीष चौहान, विलास रेणके आदींनीही मिरगणे यांच्याकडून झालेल्या टीकेचा समाचार घेत निषेध व्यक्त केला. या वेळी मिरगणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बंडू माने, उपनगराध्यक्ष संदीप बारंगुळे, आरोग्य सभापती मकरंद निंबाळकर, तानाजी मांगडे, युवराज काटे, अजित बाबर, कसबा ग्रुपचे श्रीकांत शिंदे, पंकज शिंदे आदी उपस्थित होते.

हे आंदोलन राजकीय असून केवळ स्टंट आहे. यावरून बार्शी तालुक्यातील दुष्काळी स्थितीचे राष्ट्रवादीला किती भान आहे धनंजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, बार्शी
छायाचित्र: बार्शीत मिरगणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.