आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकांची उद्या नवी मुंबईत परिषद: राज्य सहकारी बँकेचे आयोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राज्यसहकारी बँकेने (शिखर) नवी मुंबईतल्या वाशी येथील प्रशासकीय कार्यालयात गुरुवारी (ता. ६) जिल्हा बँकांची राज्यस्तरीय परिषद बोलावली आहे. त्यात जिल्हा बँकांतील विविध समस्यांवर चर्चा होईल, अशी माहिती शिखर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी दिली.
राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील या परिषदेचे उद््घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याच उपस्थितीत अल्पमुदतीची पीककर्जे मध्यम मुदतीत रूपांतर करणे, शासकीय कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करणे, खरीप पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणे, एनपीए कमी करणे, साखर कारखान्यांना ‘एफआरपी’ साठी सॉफ्टलोन उपलब्ध करून देणे अशा अनेक प्रश्नांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी सहकार विभागाचे प्रधान सचिव एन. के. शर्मा, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, राज्य बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेव, सदस्य ए. ए. मगदूम, के. एन. तांबे, नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक के. आर. राव, प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. यू. एस. साह मार्गदर्शन करणार आहेत. सहकारी बँकांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कर्नाड यांनी केल आह
बातम्या आणखी आहेत...