आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध रूपाभवानी मंदिरासह सर्व शक्ती मंदिरे लागली सजू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच शक्ती मंदिरात वेगाने स्वच्छता सुशोभीकरण कामे होत आहेत. तसेच, विविध समाज नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत.
प्रामुख्याने रूपाभवानी मंदिरात आतापासूनच संपूर्ण मंडप उभारणीचे काम सुरू असून मंदिर कळसास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, रस्त्याच्या दुतर्फा विविध साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. यात गृहोपयोगी साहित्य, खेळणी, अलंकार, कपडे खाद्यपदार्थांचा समावेश आहे. मंदिरात रंगरंगोटी करण्यात आली असून गाभाऱ्याच्या बाह्य भिंतीवर गर्भगृहात प्रवेश करण्याच्या जागेस सोनेरी रंगाने रंगविण्यात आले आहे. रोज रात्री निघणाऱ्या छबिना मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या विविध वाहन सेवांची ही स्वच्छता करण्यात आली आहे. यात मोर, वाघ, सिंह, गरुड आदी वाहन सेवांचा समावेश आहे.
मराठा वस्ती परिसरातील शिवगंगा आणि नीलगंगा मंदिरास एलईडी दिव्यांची आकर्षक रंगसंगतीची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

विश्व ब्राह्मण सोनार समाजाची कालिका माता, दाधिच दायमा समाजाची दधिमथी माता, पूर्व भागातील भारतीय चौकातील भवानी माता, तेली समाज देवी आदी मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यातील दाधिच समाजाच्या वतीने यंदाही अनेक कार्यक्रम आहेत. यात येत्या ऑक्टोबरपासून होत असलेल्या नवरात्री उत्सवात हजार ००१ कमल पुष्प अर्चना, घटस्थापना शोभायात्रा 1 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबरला कमल पुष्प अर्चना, तारखेला श्रीसूक्त दुर्गा पाठ, तारखेला दांडिया रातीजोगा, तारखेला नवचंडी महायज्ञ, १०ला महाप्रसाद बी. सी. गर्ल्स हॉस्टेलमधील १२१ कन्यका पूजन कोजागरी पौर्णिमेनिमित्त दुग्धाभिषेक आदी कार्यक्रम आहेत.

दुरड्या,टोपल्यांना मागणी : घटस्थापनेतवापरण्यात येणाऱ्या बांबूच्या छोट्या टोपल्या म्हणजे दुरड्या मोठ्या टोपल्यांना या काळात मागणी असून ५० रुपयांपासून याच्या किमती आहेत. पिंजर, वेलवेट, तुळजाई कुंकवाची विक्री होत असून ५० ग्रॅमला १० रुपयांपासून दर आहेत. कपाळास लावण्याचे आणि मिरवणुकीत उडवायच्या गुलाल पोत्यांचीही विक्री होत आहे.
-ऑक्टोबर, ऑक्टोबरला कमल पुष्प अर्चना, तारखेला श्रीसूक्त दुर्गा पाठ, तारखेला दांडिया रातीजोगा, तारखेला नवचंडी महायज्ञ, १०ला महाप्रसाद बी. सी. गर्ल्स हॉस्टेलमधील १२१ कन्यका पूजन कोजागरी पौर्णिमेनिमित्त दुग्धाभिषेक आदी कार्यक्रम आहेत.

दुरड्या,टोपल्यांना मागणी
घटस्थापनेत वापरण्यात येणाऱ्या बांबूच्या छोट्या टोपल्या म्हणजे दुरड्या मोठ्या टोपल्यांना या काळात मागणी असून ५० रुपयांपासून याच्या किमती आहेत. पिंजर, वेलवेट, तुळजाई कुंकवाची विक्री होत असून ५० ग्रॅमला १० रुपयांपासून दर आहेत. कपाळास लावण्याचे आणि मिरवणुकीत उडवायच्या गुलाल पोत्यांचीही विक्री होत आहे.

२९ तारखेला उच्च न्यायालयात सुनावणी
रूपाभवानी मंदिरातील धार्मिक विधी पाहणारे मसरे पतंगे यांच्यात सुरू असलेल्या वादासंदर्भात २९ सप्टेंबर रोजी मुंबई न्यायालयात सुनावणी आहे. यात काही महोत्सवांच्या गोष्टींवर सुनावणी होणार आहे. त्यानंतर यात्रेचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान तम्मा मसरे यांना याबद्दल विचारणा केली असता हे न्यायालयीन प्रकरण आहे, यावर काही बोलणे उचित नसल्याचे त्यांनी सांगितले. पण प्रतिवर्षाप्रमाणे घटस्थापना, उत्सव, छबिना होईल असे दोघांनी सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...