आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रूपाभवानी मंदिरात सीसीटीव्ही सुरू, भीज पावसातही आदिशक्तीचा जागर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रूपाभवानीमंदिर परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार अाहे. दोन पाळ्यात बंदोबस्त तैनात करण्यात अाला अाहे. पोलिस निरीक्षक, फौजदार पन्नासहून अधिक पोलिस कर्मचारी असा ताफा अाहे. महिला पोलिसांचे पथक वेगळे राहणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांनी दिली.
वाहतूक नियोजनासाठी वेगळे पथक अाहे. सिध्देश्वर वुमेन्स काॅलेज, घोंगडेवस्ती, मंत्री-चंडक काॅलनीजवळ वाहनतळ आहे. पहाटे दोन ते सकाळी अाठ यावेळेत गस्त पथकाकडून बंदोबस्त अाहे. भाविकांना माईकवरून सूचना देण्यात येणार अाहे.

पावसाचेटपोरे थेंब अंगावर घेत आदिशक्ती महामाया देवीचा जागर शनिवारी शहरभर घुमला. आई राजा उदो उदोच्या गजरात नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. शहरातील सर्व प्रमुख मंडळे, शक्ती मंदिरे घरगुती देवीची सकाळच्या सत्रात घटस्थापना होत नवरात्रीच्या पवित्र उत्सवास सुरुवात झाली. काही मंडळांनी सवाद्य मिरवणुका काढल्या तर काहीनी जागच्या जागी प्रतिष्ठापना केली.

सकाळी नऊच्या सुमारास रूपाभवानी मंदिरात घटस्थापना झाली. या वेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पुजारी सचिन पवार, बंडू पवार, सागर पतंगे, अनिल पतंगे, गौरव जक्कापुरे, शाहू शिंदे, भय्या दहीहंडे, अमोल यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंदिरात पहाटे चार वाजल्यापासून भाविकांची गर्दी होती. परगावाहून धावत तर काही ठिकाणी दुचाकींवरून भवानी ज्योत मंदिरात दाखल होत होत्या. मंडळाचे बनियन, टी शर्ट घालून भाविक मंदिरात येत होते. महिला भाविकांची गर्दी मोठी होती. परिसरात पूजा साहित्य विक्री दुकाने होती. पोलिसांचा बंदोबस्त मंदिर समितीचे नियोजन यामुळे भाविकांना दर्शन घेण्यात अचडणी आल्या नाहीत.

बहुतांश मंडळांच्या मिरवणुकांत डीजे डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्ये गर्जली. तसेच तरुणांसह अबाल वृद्धही लयबद्ध लेझीम झांजचे खेळ सादर करत होते. प्रत्येक मंडळाचा एक वेगळा पोषाखही होता. पूर्व भागातील मंडळांनी विविध लाठी, काठी, दांडपट्टा आदी साहस दृश्ये सादर केली. सायंकाळपर्यंत वाजत, नाचत प्रतिष्ठापना करीत होते.

सर्व शक्तिमंदिरात गणेश पूजन, होमहवन, श्री सुक्त पठण, दुर्गा सप्तशती पठण, देवी अनुग्रह, कुंकुमार्चन आदी धार्मिक विधी होत होते. आजपासून मूर्तीस रूपाने सजवणे सुरू झाले.
यांच्याझाल्या सवाद्य प्रतिष्ठापना : संग्रामतरुण मंडळ, नवजवान गल्ली, वडार समाज शक्ती मंडळ, जुनी मिल चाळ, वारद चाळ तरुण मंडळ, मेकॅनिकी चौकातील आझाद हिंद मंडळ, प्रताप नगर, मेघराज नवरात्र मंडळ, तुळजापूर वेस अग्र मानिनी, शाहीर वस्ती जागृती माता, बाळीवेस दीपक शक्ती पूजा, बाळीवेस नवरात्र मंडळ, गवंडी गल्ली, पत्रा तालीम, शिंदे चौक, भागवत चाळ युवक मंडळ, भारतीय चौकभवानी माता, बेगम पेठ सरदार वल्लभभाई पटेल तरुण मंडळ, गवळी समाज मंडळ, लष्कर जगदंबा चौक शक्तिपूजा मंडळ, माणिक चौक मधला मारुती व्यापारी शक्तिपूजा मंडळ, मराठा वस्ती शिवगंगा नवरात्रोत्सव मंडळ, नीलानगर नवरात्र मंडळ, पाणीवेस, टिळक चौक नवरात्र मंडळ, हिंगलाज माता हिंगुलांबिका देवस्थान, चौडेश्वरी मंडळ, युवाचैतन्य मंडळ, आंध्र युवक मंडळ, शेळगीतील बनशंकरी नवरात्रोत्सव मंडळ, दाधिच समाज दधिमथी माता माताराणी उत्सव मंडळ, कालिका देवस्थान आदी.

घराघरांत घटस्थापना
प्रथाअसलेल्या घरांमध्ये सकाळी मुहूर्तावर घटस्थापना झाली. यासाठी बाजारात मातीचे ढिगारे, विविध बी-बियाणे, खते, घट, बांबूच्या दुरड्या आदींची विक्री होत होती. मधला मारुती, कस्तुरबा मंडई, टिळक चौक, अासरा चौक, विजापूर नाका, चैतन्य भाजी मंडई आदी भागात हे पूजा साहित्य विक्री होत होते.

बातम्या आणखी आहेत...