आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सवाची लगबग सुरू, महापालिका प्रशासन कामाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नवरात्र महोत्सवाला तीन दिवसांत सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विजयकुमार काळम- पाटील आणि पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी यांनी मंगळवारी रूपाभवानी मंदिर परिसराला भेट देऊन पाहणी केली. नवरात्र काळात मंदिराला येणारे जत्रेचे रूप ध्यानात घेऊन पाच आॅक्टोबरपूर्वी सर्व कामे पूर्ण करा, असे आदेश आयुक्त काळम पाटील यांनी दिले आहे.

मंदिर परिसरात खड्डे असून तेथील रस्त्यावर बारीक खडे आणि दगड आहेत. दर्शनासाठी अनवाणी येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी रस्ता रोज झाडून काढण्यात येणार आहे. पाणी, दिवाबत्ती, कचरा नियोजन आदी सुविधा पुरवण्याचे आदेश संबंधित विभागांना देणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, नगरसेवक सुरेश पाटील, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी आदी उपस्थित होते.

मंगल कार्यालय द्या
मंदिरपरिसरात महापालिकेचे मंगल कार्यालय आहे. एका सामाजिक संस्थेने त्याची मागणी केली आहे. मनपा वापर करत नसेल तर पोलिस प्रशिक्षण केंद्रासाठी ती इमारत द्या, अशी मागणी पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी केली आहे.
घरा-घरांतून स्वच्छता
शहरातसर्वत्र नवरात्रोत्सव तयारीची लगबग दिसत आहे. देवी मंदिरे, नवरात्र मंडळ आणि तरुण मंडळांमध्ये तसेच घरा-घरांमध्ये स्वच्छता, रंगरंगोटी आदी होत असल्याचे चित्र आहे.
विविध मंडळांनी मंडप उभारणी सुरू केली असून यंदा कैंची प्रकारातील मंडप बांधण्यात येत आहेत. बांबू ऐवजी लोखंडी अँगलचा उपयोग करून मंडप उभारत आहेत. ग्रामदेवी श्री रूपाभवानी मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी विशेष योजना केली आहे. मंदिरात मंडप उभारणी, रंगरंगोटी, सीसीटीव्ही लावणे आदी कामे सुरू आहेत. कळसावर आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. परिसरात विविध वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात येत आहेत.

रंगारीआणि रंगसाहित्य
बाजारातविविध प्रकारच्या रंगांची विक्री होताना दिसत आहे. सिमेंट पेंट, डिस्टेंपर पासून ऑईल बाँड प्रकारातील रंग ३५ रुपये किलाे पासून शेडनुसार विक्रीस आहेत.
विविध पूजा साहित्य दुकानात कुंकू, तोरण, कवड्यांचे साहित्य विक्रीस आले आहेत. तसेच काळी माती, बियाणे, वेताच्या दुरड्या आदी घटाचे साहित्य विक्रीस आहे.

स्मशान भूमीची कामे
रूपाभवानीपरिसरात मनपाची बाग आहे. त्याची योग्य देखभाल करण्याच्या सूचना मनपा अधिकाऱ्यांना देण्यात अाल्या. राष्ट्रीय महामार्गाच्या पुढील बाजूस असलेल्या स्मशानभूमीत रानटी झुडपे वाढली आहेत. रस्ताही नाही. ही असुविधा त्वरित दूर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
बातम्या आणखी आहेत...