आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरबा, दांडियात रमली तरुणाई, गुजराती गाण्यांवर जल्लोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नवरात्रमहोत्सवा निमित्त दिव्य मराठी मधुरिमा क्लब, श्रीज डान्स अकॅडमी अॅण्ड प्रियंका वुमन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रात्री गांधी नगर येथील हेरिटेज लॉनवर "दुर्गा दांडिया नवमी नाइट' कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमात सोलापूरची तरुणाई मनसोक्त थिरकली. स्पर्धेतील विजेत्यांना विविध बक्षिसांनी गौरवण्यात आले. गुजराती, राजस्थानी आणि हिंदी गीतांवर गरबा दांडियात युवक युवतींनी जल्लोष केला.

सायंकाळी सात वाजता पूजा करून कार्यक्रमास सुरुवात झाली. गरबाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. परीक्षक म्हणून शिल्पा गोत्रा, नवाज बक्षी, हेमा काबरा, निकिता पटेल, भद्रेश शहा, आचल पटेल, गीता शहा, रितू राठी यांनी काम पाहिले.

गुजराती,मारवाडी वेशभूषा
कार्यक्रमासाठी गुजराती आणि मारवाडी वेशभूषेत तरुण-तरुणी नटून थटून आले होते. हिंदी चित्रपटातील जय जय संतोषी माता, मैं तो भूल चली बाबूल का देस, ढोली तारो ढोल बाजे, राधा कैसे ना जले, नगाडा संग ढोल बाजे, लाल दुपट्टा उड गया रे, भिगे भिगे रातो में, गुजराती भाषेतील मारी म्हैसागर नी आरे ढोल, ऊँ ची तलवाडी नी कोर, तर राजस्थानी भाषेतील मैं तो गर्भा, ऊँ चो माता जी, प्रेम सगाई आदी विविध गाण्यांवर तरुणाई थिरकली.

स्टार्स ऑफ मेलडी या ऑर्केस्ट्रातील कलाकरांच्या सुरेल आवाजाला उपस्थितांतून वन्स मोअरची दाद मिळाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सर, हर्षल खरटमल, मानसी हबीब, दीपा मडकी, आम्रपाली कोनापुरे, सोनिया दरगड, अमिर बागवान, प्रतीक शहा, अजिंक्य बाकळे, दर्शन ढगे आदी अनेकांनी परिश्रम घेतले.


सदस्यांनी लुटला आनंद
यावेळी मधुरिमा क्बलच्या सदस्यांनी गरबा दांडिया खेळून आनंद लुटला. मुधरिमा क्लबच्या सदस्यांसाठी पासेसची व्यवस्था तर इतर महिलांना प्रवेश शुल्क आकारण्यात आले. संपूर्ण नवरात्र महोत्सवात बालाजी सरोवर, पर्ल गार्डन, हेरिटेज गार्डन, नॉर्थ कोट मैदान आदी चार ठिकाणी दिव्य मराठी मधुरिमा क्लब सदस्यांसाठी गरबा दांडियाचे आयेाजन करण्यात आले होते.
हेरीटेजच्या लॉनवर गरबा दांडिया खेळण्यात रमलेली तरुणाई.